शिरूर तालुका

शिरुर; ग्रामीण भागातील हजारो निराधार महिलांचा आधार ठरतंय बंधन आणि ITC मिशन सुनहरा कल

कान्हूर मेसाई (सुनील जिते) ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ITC मिशन सुनहरा कल अंतर्गत ‘बंधन संस्था’ निराधार महिलांना आधार देण्यासाठी पुढे आली असुन काही महिलांच्या घरातील एक वेळेची चुल पेटत नाही अशा महिलांना छोटे छोटे व्यवसाय जसे की कपडे, किराणा किट, चप्पल जुते, बांगडी, भाजी पाल्याची गाडी, कॉस्मिटिक सामान इत्यादी सामानाचे वाटप करण्यात आले.

यावेळी महिलांना मार्गदर्शन करतांना शबांना पटेल म्हणाल्या की, महिलांनी नव्या ताकदीने व्यवसाय उभा करा. प्रामाणिकपणे व सचोटीने व्यवसाय करा. कधीकधी आपल्या घरातील व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु ‘बंधन’ हि सेवाभावी संस्था हि तुमच्या पाठीशी उभी असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

यावेळी मलठण गावचे सरपंच विलास थोरात, म्हसे गावचे सरपंच जालिंदर मुसळे, सामाजिक कार्यकर्ते काळुराम पवार, मलठण गावच्या सीआरपी शबाना पटेल, अनिता अभंग, बंधनचे एरिया कॉर्डिनेटर संजीब बावरी, रजत मंडळ, अंमल मंडळ, महादेव गायकवाड आणि लाभार्थी महिला उपस्थित होत्या.

बापरे! शिरूर तालुक्यात एकाच रात्रीत चोरटयांनी केली १३ विद्युतपंपांची चोरी

शिरूर! तक्रार मागे घे, नाहीतर पुन्हा जिवंत सोडणार नाही

घोड धरणातुन बेकायदेशीर वाळु उपसा सुरुच; प्रशासन हतबल…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

11 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

12 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

12 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

12 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

12 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

12 तास ago