भाजपा व शिवसेनेच्या तालुकाध्यक्षांना छत्रपतींच्या घोषणांचा विसर
शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते अजित पवार व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत अजित पवार व जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले मात्र यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सासवडे यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या घोषणांच विसर पडल्याचे दिसून आले.
राष्ट्रवादीचे नेते तसेच राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी नागपूर येथील विधानसभेतील अधिवेशनामध्ये संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हेतच असे बेताल व्यक्तव्य करून तमाम महाराष्ट्राच्या असंख्य शंभू भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब यांचे समर्थन करण्याच्या हेतूने वक्तव्य केल्याने भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने कोरेगाव भीमा येथे आंदोलन करण्यात आले,
दरम्यान आंदोलकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत निषेध व्यक्त केला असून अजित पवार व जितेंद्र आव्हाड यांना शिरुर तालुक्यात फिरु देणार नसून येथे आल्यास त्यांचे थोबाड रंगवू अशा इशारा देखील दिला आहे, तर अजित पवार यांनी छत्रपतींच्या समाधीस्थळी येऊन लोटांगण घेऊन माफी मागावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली केली.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रोहित खैरे, दिलीप शेलार, अल्पसंख्याक आघाडीच्या रेश्मा शेख, प्रमिला दरेकर, अनघा पाठक, वृषाली गव्हाणे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल काशीद, तालुकाध्यक्ष रामभाऊ सासवडे, पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग, विक्रम पाचुंदकर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, सचिन भंडारे, बाजार समितीचे माजी संचालक राहुल गवारे, हर्षद जाधव, बापूसाहेब काळे, अमोल गव्हाणे, सनी कांबळे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते, यावेळी आंदोलनी घोषणाबाजी करत दोन्ही नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.
मात्र यावेळी अनेकांनी निषेधप्र मनोगत व्यक्त करताना निषेधाच्या घोषणा देत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने सुद्धा घोषणा दिल्या परंतु भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सासवडे यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या घोषणांचा विसर पडला असल्याचे दिसून आले, तर अजित पवार यांनी लवकरात लवकर माफी मागितली नाही तर अजूनही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.
अजित पवार यांना यापूर्वी तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर म्हणून चालत होते मात्र सध्या अचानक काय झाले तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर म्हणून नको वाटत आहे, असा सवाल देखील भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी व्यक्त केला.
नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…
मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…
खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…