Categories: क्राईम

केंदूर मध्ये शेतातील वादातून महिलेला मारहाण

केंदूर (ता. शिरुर) येथील महादेववाडी येथे शेतातील बांधाच्या वादातून एका महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सविता अशोक जाधव, अशोक किसान जाधव, शांताबाई किसन जाधव यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

केंदूर (ता. शिरुर) येथील सुनंदा जाधव या त्यांच्या शेतात असताना सविता जाधव व शांताबाई जाधव या दोघी त्यांच्या शेतातील बांधावरील दगडे सुनंदा जाधव यांच्या मकेच्या शेतात टाकून देत सुनंदा यांना शिवीगाळ करत होत्या यावेळी तुम्ही माझ्या मकेचे नुकसान का करता व मला शिवीगाळ का करता असे सुनंदा यांनी म्हटले असता तिघांनी त्यांना दमदाटी करत हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

याबाबत सुनंदा ज्ञानेश्वर जाधव (वय ५५) रा. महादेववाडी केंदूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सविता अशोक जाधव, अशोक किसान जाधव, शांताबाई किसन जाधव सर्व रा. महादेववाडी केंदूर ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश सुतार हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video; कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार; डॉ अमोल कोल्हे

शिरुर (तेजस फडके) विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. त्यामुळं ते रडीचे डाव खेळत आहेत. पण पराभवाची…

1 दिवस ago

हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करा अन्यथा रस्त्यावर उतरु; वीज कर्मचारी संघटनांचा एल्गार

बारामती (प्रतिनिधी) किरकोळ वीजबिलाच्या कारणावरुन एका महिला वीज कर्मचाऱ्याचा खात्मा करणाऱ्या आरोपीचा बंदोबस्त करावा. तसेच…

1 दिवस ago

डॉ अमोल कोल्हे यांना आमच्या मतांची गरज नाही का…? शिंदोडी, गुनाट व चिंचणी ग्रामस्थांचा सवाल…?

शिरुर (तेजस फडके) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सध्या कडक उन्हाळ्याबरोबरच निवडणुकीचे वातावरण तापले असुन डॉ अमोल…

1 दिवस ago

शिरुरमध्ये ‘ह्याला आम्ही पाडणार, गद्दारांना गाडणार’ असा मजकुर टाकत आढळराव यांच्या विरोधात बॅनरबाजी

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदार संघात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असुन माजी खासदार शिवाजीराव…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यातील ‘हेलपाटा’ कादंबरीच्या लेखकाचा विद्यालयात सन्मान!

शिरूर : शिरूर तालुक्यातील 'हेलपाटा' कादंबरीचे लेखक व श्री मल्लिकार्जुन विद्यालयाचे (न्हावरे) माजी विद्यार्थी तानाजी…

2 दिवस ago

घोलपवाडी येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरामुळे सामाजिक व धार्मिक एकोपा वाढेल; चंद्रकांत वांजळे

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) श्री क्षेत्र टाकळी भीमा (घोलपवाडी) येथील बांधण्यात आलेले दक्षिणमुखी मारुती मंदिरामुळे…

3 दिवस ago