मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात अपहरण करुन खुनाचा प्रयत्न; तीन आरोपींना अटक

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील रांजणगाव ते बाभुळसर खुर्द दरम्यानच्या अष्टविनायक महामार्गावर दि 14 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1:30 च्या सुमारास पिस्तुलाचा धाक दाखवत एका व्यक्तीचे अपहरण करुन भांबार्डे येथील डोंगरावर नेत त्याला मारहाण करुन अष्टविनायक रोडने (पोंदेवाडी, ता. आंबेगाव, जि.पुणे) येथील फॉरेस्ट मध्ये सोडुन दिले होते. यातील तीन आरोपीना रांजणगाव MIDC पोलिसांनी अटक केली आहे.

 

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भांबार्डे येथील समिर उर्फ सोन्या तिरखंडे याने फिर्यादी अजित हनुमंत ढेरंगे याला रांजणगाव ते बाभुळसर खुर्द दरम्यानच्या अष्टविनायक महामार्गावर बोलावुन घेवुन तु माझ्या बहिणीला त्रास का देतो…? असे म्हणत त्याच्या साथीदारांच्या मदतीने अजित ढेरंगे याला मारहाण करुन व पिस्तुलाचा धाक दाखवुन त्यांच्याकडील चारचाकी गाडीतुन अपहरण करुन अष्टविनायक रोडने (पोंदेवाडी, ता. आंबेगाव, जि.पुणे) येथील वनविभागाच्या हद्दीमध्ये घेऊन गेले. त्या ठिकाणी ढेरंगे याला आरोपीनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात तसेच दोन्ही हातावर कोयत्याने वार करुन त्यास गंभीर जखमी केले असुन जखमी अजित ढेरंगे याच्यावरती मंचर येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालु आहेत.

 

सदर प्रकरणी अजित हनुमंत ढेरंगे याच्या फिर्यादीवरुन 1) प्रविण वाळके (रा. बाभुळसर खुर्द, ता. शिरूर, जि. पुणे), 2) समिर उर्फ सोन्या मच्छिंद्र तिरखंडे, 3) सागर मच्छिंद्र तिरखंडे दोघेही (रा. भांबार्डे, ता. शिरुर, जि. पुणे), 4) हर्षद गोसावी (रा. शिरुर, बाबुरावनगर), 5) रमाकांत सतिष जासुद (रा. करडे, चव्हाणवाडी, ता. शिरुर, जि. पुणे), 6) सुजाता संजय भोंडवे (रा. भांबार्डे, ता. शिरुर, जि.पुणे), यांच्या विरुध्द रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये दि. 15 फेब्रुवारी 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सदर गुन्हयातील आरोपी हे गुन्हा घडल्यानंतर फरार झाले होते. सदर घटनेचे गांभीर्य ओळखत शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना आरोपीचा शोध घेण्यासाठी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन स्वतंत्र तपास पथके रवाना केली होती. या तपास पथकाने नारायणगाव, मंचर, जुन्नर, अहमदनगर, केडगाव-चौफुला इत्यादी ठिकाणी शोध घेवुन सदर गुन्ह्यातील आरोपी 1) रमाकांत सतीष जासुद याला दि. 16 फेब्रुवारी 2024 रोजी तर 2) समिर उर्फ सोन्या मच्छिंद्र तिरखंडे, 3) सागर मच्छिंद्र तिरखंडे दोन्ही (रा. भांबार्डे, ता. शिरुर, जि.पुणे) यांना दि 19 फेब्रुवारी 2024 रोजी अटक करुन शिरुर येथील न्यायालयात हजर केले असता. या आरोपीना दि. 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे.

 

सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस निरीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार, माऊली शिंदे, पांडुरंग साबळे, माणिक काळकुटे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे हे करत आहेत.

 

हॉटेल मधील ‘त्या’ गुप्त बैठकीची जोरदार चर्चा…

रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील रांजणगाव ते बाभुळसर खुर्द दरम्यानच्या अष्टविनायक महामार्गावर दि 14 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1:30 च्या सुमारास पिस्तुलाचा धाक दाखवत एका व्यक्तीचे अपहरण करत मारहाण करुन त्याला चारचाकी गाडीतुन अपहरण करुन अष्टविनायक रोडने (पोंदेवाडी, ता. आंबेगाव, जि.पुणे) येथील वनविभागाच्या हद्दीमध्ये टाकुन दिल्यानंतर या घटनेतील आरोपी फरार झाले होते. त्यानंतर रांजणगाव येथील एका हॉटेल मध्ये काही राजकीय पुढारी आणि आरोपीशी संबंधित काही व्यक्तींची गुप्त बैठक झाल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली आहे. या गुप्त बैठकीनंतर काही आरोपीची नावे गुन्ह्यातुन वगळण्यात आल्याची दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा सुरु असुन या प्रकरणात अजुनही काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करावा अशी मागणी पुढे येत आहे.

 

 

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे किराणा दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी तब्बल 26 लाखाचे नुकसान

शिरुर (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी (ता.शिरुर) येथे सागर किराणा स्टोअर्स या दुकानाला आज गुरुवार (दि.२)…

3 तास ago

Video; न्हावरे येथील घोडगंगा कारखान्याच्या भंगाराला आग; अग्निशमन दलाच्या जवानांमुळे वेळीच आग आटोक्यात

शिंदोडी (तेजस फडके) न्हावरे (ता. शिरुर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या आवारातील भंगारात…

4 तास ago

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक कामगार दिन साजरा

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आज महाराष्ट्रदिन तसेच कामगारदिनाचे औचित्य साधुन रामलिंग येथील ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कामगार…

1 दिवस ago

शिरुर; महसुल यंत्रणा निवडणुकीत व्यस्त असल्याने माजी सरपंचाचा नातेवाईकच करतोय घोड धरणातुन वाळूचोरी

शिंदोडी (तेजस फडके) सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालु असुन शिरुर तहसीलदार कार्यालयातील महसूलचे…

2 दिवस ago

कासारी येथील महानुभव आश्रमाच्या आवारात जेसीबीच्या साह्याने तोडफोड केल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्याच्या कडेला कासारी (ता. शिरुर) गावच्या हद्दीत असणाऱ्या श्रीकृष्ण मंदिर…

3 दिवस ago

केसनंद येथील भीषण अपघातात शिरुर तालुक्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी

वाघोली (प्रतिनिधी) केसनंद (ता.हवेली) येथे रविवार (दि २८) एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजुन 10 मिनिटांच्या…

3 दिवस ago