कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यात सध्या बेकायदेशीर पिस्टल बाळगण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असुन रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगारवर्ग असल्याने त्यांच्या मदतीने परराज्यातुन अवैधरित्या पिस्टल मागविले जातात. कारेगाव MIDC परीसरातील यश इन चौक येथे गावठी पिस्टल जवळ बाळगणाऱ्या एकास रांजणगाव पोलिसांनी एकास अटक केली आहे.
रांजणगाव पोलिसांनी मागील चार महिन्यापुर्वी 8 पिस्टल, 5 जिवंत काडतुसे आणि 3 सिनेस्टाईल लोखंडी कोयते जवळ बाळगणा-या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. नुकताच पुणे ग्रामीण जिल्ह्याचा पोलीस अधिक्षक पदाचा कार्यभार स्विकारलेले पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणा-या व्यक्तीविरुध्द कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी अशा प्रकारे अवैधरीत्या शस्त्रे बाळगणा-या रेकॉर्डवरील आरोपींबाबत माहिती काढुन कारवाई करण्याबाबत तपास पथकास सुचना दिल्या होत्या.
दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना गुप्त बातमीदारामार्फत रांजणगाव MIDC परिसरातील यश इन चौक येथे सुशांत कराळे (रा.बाभुळसर खुर्द) हा गावठी पिस्टल जवळ बाळगुन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, पांडुरंग साबळे यांना योग्य त्या सुचना देवुन कारवाई करण्यासाठी पाठविले. त्यानुसार तपास पथकाने यशईन चौक येथे सापळा रचत संशयीत सुशांत कराळे यास दुपारी 1 च्या दरम्यान पकडले.
त्यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 30 हजार रुपये किंमतीचे एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस मिळुन आले आहे. त्याच अनुषंगाने आरोपी नामे सुशांत रमेश कराळे (रा. बाभुळसर खुर्द, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरुध्द रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव MIDC चे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, पांडुरंग साबळे, यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस हवालदार विजय सरजिने हे करत आहेत.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…