मुख्य बातम्या

शिरुर; माजी सैनिक पत्नीच्या फसवणुक प्रकरणात झारीतील शुक्राचार्य असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची लुडबुड सुरुच…?

शिंदोडी (तेजस फडके) करडे (ता. शिरुर) येथील डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Wsquare feeds india private limited) या कंपनीत एका माजी सैनिकाची पत्नी कंपनीत भागीदार असताना बनावट कागदपत्रे बनवुन तिचा राजीनामा घेत तिला कंपनीच्या भागीदारीतुन काढुन टाकण्यात आले असल्याने रेश्मा राहुल वाळके (वय ३७) रा. करडे यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे चार जणांविरोधात २७ जानेवारी २०२५ रोजी चार जणांविरोधात फिर्याद दाखल केलेली आहे. परंतु फिर्याद दाखल केल्यानंतर २२ दिवस उलटूनही आरोपी अजुनही चार पैकी एकाही आरोपीला अटक झालेली नाही.

 

याबाबत तालुक्यातील माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आधी शिरुरचे तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांची भेट घेत फरार आरोपीना तातडीने अटक करावी अन्यथा माजी सैनिकांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु त्यानंतरही पोलिसांनी काहीच हालचाल न केल्याने माजी सैनिकांनी दि ३१ जानेवारी २०२५ रोजी शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांची भेट घेतली होती.

 

तसेच पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनीही या केस मध्ये विशेष लक्ष घाललेले असतानाही शिरुर पोलिस स्टेशन मधील एक वरिष्ठ अधिकारीच आरोपीच्या संपर्कात राहुन त्यांना मदत करत असल्याचा गंभीर आरोप करत माजी सैनिक पत्नीने पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षकांकडे या अधिकाऱ्याची लेखी तक्रार करुनही आरोपीना मदत करणाऱ्या झारीतील शुक्राचार्य असणाऱ्या या अधिकाऱ्याची तातडीने बदली करण्यात यावी अशीही मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

 

बावीस दिवस उलटुनही आरोपी फरारच…? 

करडे येथील माजी सैनिक पत्नीची आर्थिक फसवणुक आणि जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतर माजी सैनिक आणि त्याच्या पत्नीने २७ जानेवारी २०२५ रोजी शिरुर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केल्यानंतर २२ दिवस उलटूनही यातील चार आरोपी फरार असुन पोलिसांना अजुनही ते सापडले नाहीत. शिरुरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे आणि तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सागर शेळके हे आरोपीचा कसुन तपास करत आहेत. परंतु याचं पोलिस स्टेशन मधील एक वरिष्ठ अधिकारी आरोपीच्या संपर्कात राहत त्यांना मदत करत आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटाचे कथानक शोभेल अशीच काहीशी सध्या या तपासाची अवस्था झालेली आहे.

(क्रमशः) 

शिरुर; माजी सैनिकाच्या पत्नीची कंपनीच्या भागीदारीत फसवणुक करत जिवे मारण्याची धमकी

‘कुणी न्याय देईल का न्याय’; माजी सैनिकाच्या पत्नीची आर्त हाक; आरोपी अद्यापही मोकाट

माजी सैनिक पत्नीच्या आर्थिक फसवणुक प्रकरणी आमदारांच्या फोन नंतरही आरोपीना अटक नाहीच; पोलिसांची भुमिका संशयास्पद…?

शिरुर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर माजी सैनिक पत्नीचा गंभीर आरोप; पोलिस अधिक्षकांकडे तक्रार

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

7 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

21 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago