मुख्य बातम्या

महीला दिनानिमित्त शिरूर पोलिस स्टेशनमध्ये महीलाराज

शिरुर (अरुणकुमार मोटे): जागतिक महिला दिनानिमित्त शिरूर पोलिस स्टेशनच्या विविध पदांचा पदभार महिला पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय सक्षमपणे सांभाळला आहे.

शिरूर पोलिस स्टेशनमध्ये डे आधिकारी म्हणुण महीला पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील, ठाणे अंमलदार महीला पोलिस हवालदार रेखा टोपे, राखीव ठाणे अमंलदार महीला पोलिस नाईक कल्पना ठोंबरे, ठाणे अमंलदार मदतनीस महिला पोलिस अंमलदार शोभा ससे, सी.सी .टी.एन.एस ड्युटीकरता महीला पोलिस अमंलदार अर्चना यादव, वायरलेस ड्युटी करीता महीला पोलिस अमंलदार गौरी अवचार,  बारनिशीचे कामकाज महीला पोलिस अमंलदार सुवर्णा नरवडे यांनी कामकाज पाहीले. महिला पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या विविध तक्रारी ऐकुण व जाणून घेऊन योग्य त्या तक्रारी दाखल करून घेतल्या.

शिरूर पोलिस स्टेशनचा कार्यभार उत्तमरीत्या सांभाळून या महिलांनी पुरुष पोलिस आधिकारी व पोलिस अमंलदार यांच्या प्रमाणे सक्षमरीत्या कामकाज करत ‘ आम्ही कोठेही कमी नसल्याचे ‘ दाखवून दिले आहे. शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी महीलांना जागतिक महिलादीनी पोलिस स्टेशनच्या महत्वाच्या पदांचा पदभार देऊन नारी शक्तीचा आदर केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिरूरमधील महीलांमधून, नागरीकांमधून त्यांच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

13 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

13 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

13 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

13 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

14 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

14 तास ago