मुख्य बातम्या

मंगलदास बांदल यांच्या अडचणीत आणखी भर; गुन्हा दाखल…

मंगलदास बांदल यांच्यावर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा
पिंपरी : पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. कंपनी मालकाच्या धनादेशांचा गैरवापर करून कंपनीच्या बँकेतील खात्यातून १ कोटी ३८ लाख रुपये दोघांच्या कर्जखात्यावर परस्पर वळवली. याबाबत कंपनी मालकाने पोलिसात तक्रार दिली असता, त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून तक्रार अर्ज माघारी घेण्यास भाग पाडले. याप्रकरणी बांदल यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

मंगलदास विठ्ठल बांदल (वय ४७, रा. शिक्रापूर) व रवींद्र गेणूभाऊ सातपुते (वय ५०, रा. निरुपम सोसायटी, आकुर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी हरबन्ससिंग सिंगारसिंग जब्बाल (वय ७२, रा. सिमरन बंगला, सेक्टर क्रमांक 27 अ, प्राधिकरण, निगडी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल २०११ ते ३० एप्रिल २०१३ या कालावधीत घडला आहे.

फिर्यादी जब्बाल यांची भोसरी एमआयडीसीत यापिशिका इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनी होती. या कंपनीच्या विक्रीपोटी जब्बाल यांना १ कोटी ३८ लाखांचा धनादेश मिळाला होता. आरोपींनी हा घनादेश जब्बाल यांच्या शिवाजीनगर येथील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील खात्यात जमा केला. त्यानंतर जब्बाल यांच्या धनादेशांचा गैरवापर करून त्यांच्या खात्यातून परस्पर रोकड आरोपींनी मित्रांच्या कर्जखात्यात वर्ग केले. त्यामुळे जब्बाल यांनी पुणे शहर पोलिस दलाच्या खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केली.

मात्र, आरोपींनी शिवाजीराव भोसले बँकेत जब्बाल यांच्या डोक्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, तक्रार माघारी घेण्यासाठी वाद मिटला असल्याचे पत्रावर जब्बाल यांची जबरदस्तीने सही घेतली. सहायक पोलिस निरीक्षक एस. ए. पांचाळ तपास करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

12 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago