शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालत, शिरूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने एका सराईत मोटारसायकल चोरट्याला अटक करत तब्बल पाच गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश मिळवले आहे. या कारवाईने शहरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.
दिनांक १५ मे २०२५ रोजी रात्री ८ ते १६ मे सकाळी ६ दरम्यान, शिरूर गावातील गुजरमळा येथील डॉ. राम मगर यांच्या बांधकाम साइटवरून ६५,००० रुपयांचे लोखंडी साहित्य अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याच्या घटनेनंतर शिरूर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला होता. या घटनेच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व त्यांच्या गुन्हे शोध पथकाने शिरूर शहरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यांच्या माहितीद्वारे कारवाई करत आर्यन एअरपोस पवार (रा. शिंदेवाडी, आष्टापूर, सध्या रा. शिरूर) याला ताब्यात घेतले. अटक केल्यानंतर पोलिस चौकशीत आरोपीने आपला साथीदार रोहित भोसले (रा. पाण्याच्या टाकीजवळ, शिरूर) याच्यासोबत मिळून मे महिन्यात शिरूर शहरातून चार मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे.
सर्व गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, चारही मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या यशस्वी कारवाईसाठी शिरूर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोसई शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, अक्षय कळमकर, अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, रवि काळे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील यांचे विशेष योगदान आहे. या कारवाईचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी कौतुक करत पुढील तपास अधिक काटेकोर करण्याचे निर्देश दिले आहेत. शहरातील चोऱ्यांच्या सत्राला ब्रेक लावणाऱ्या या कार्यवाहीने शिरूर पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…