मुख्य बातम्या

शिरुर बाह्य महामार्गावर ‘दी नाना स्पॉट’ ढाब्याजवळ एकाला पिस्तूलसह पकडले

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर बाह्यमार्गावर ‘दि नाना स्पॉट’ ढाब्याजवळ कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असुन त्याच्याकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा ४० हजार५०० रुपयाचा ऐवज जप्त केला आहे. दिपक बबन गुंजाळ (रा. गोलेगाव रोड, शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे) या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि १ फेब्रुवारी २०२५ रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्याचा तपास करत असताना या पथकाला गोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार दीपक गुंजाळ हा कमरेला पिस्तूल लावून शिरुर बाह्य महामार्गावर बंद असलेल्या ‘दी नाना स्पॉट’ धाब्याजवळ उभा आहे अशी माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने ‘दी नाना स्पॉट’ धाब्यावर सापळा रचून आरोपीला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कंबरेला एक गावठी पिस्टल व मॅग्झीनमध्ये एक जिवंत काडतुस असा एकूण ४० हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.

 

हि कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजु मोमीन, मंगेश थिगळे, सागर माळ यांनी केली असून पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशन करत आहे.

 

सात दिवसातली दुसरी कारवाई…

शिरुर शहरात सात दिवसापुर्वी किरण पवार ,साईनगर, शिरुर याला बेकायदा पिस्टल वापरल्याप्रकरणी अटक केले होते. शिरुर शहरासह तालुक्यात अनेक जण बेकायदा पिस्टल वापरत असल्याची चर्चा वारंवार होत आहे. यासाठी पोलीस यंत्रणेने सतर्क राहून योग्य वेळी कार्यवाही करणे गरजेचे आहे. पोलिसांनी अशी अवैध पिस्टल बाळगणाऱ्यांची माहीती घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.

Video: शिरुर तालुक्यातील कडबा पेंढी चोर झाला सीसीटीव्हीत कैद; ओळखा कोण…?

शिरुर; माजी सैनिकाच्या पत्नीची कंपनीच्या भागीदारीत फसवणुक करत जिवे मारण्याची धमकी

सकाळी चालणे आरोग्यासाठी फायद्याचे 

कुणी न्याय देईल का न्याय’ माजी सैनिकाच्या पत्नीची आर्त हाक; आरोपी अद्यापही मोकाट

माजी सैनिक पत्नीच्या आर्थिक फसवणुक प्रकरणी आमदारांच्या फोन नंतरही आरोपीना अटक नाहीच; पोलिसांची भुमिका संशयास्पद…?

शिक्रापुरचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांची दंबग कामगिरी, दोन स्कॉर्पिओ सह ५३ किलो गांजा केला जप्त

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

3 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

3 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

3 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

3 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

3 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

3 तास ago