आरोग्य

हिवाळ्यात ABC ज्यूस पिण्याचे जबरदस्त फायदे .

हिवाळ्यात शरीराची अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. तापमाणात घट झाल्यामुळे संसर्गासह अनेक आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. तसेच खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात.

ABC ज्यूसचं सेवन केल्याने अशा परिस्थितीत तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते. सफरचंद, बीट, गाजर, थोडं मीठ, आलं आणि लिंबू मिसळून ABC ज्यूस तयार केला जातो. ABC ज्यूसध्ये भरपूर जीवनसत्त्वं, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे हिवाळ्यात शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात.

थंडीत ABC ज्यूस पिण्याचे ५ जबरदस्त फायदे

इम्यूनिटी वाढते

ABC ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे सफरचंद आणि गाजरांमध्ये आढळतं, ज्यामुळे इम्यूनिटी वाढते. तसेत शरीराला बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून लढण्यास मदत करतं. हिवाळ्यात सर्दी आणि फ्लूपासून बचाव होतो.

त्वचेची चमक वाढते

हिवाळ्यात त्वचा अनेकदा कोरडी होते. अशावेळी ABC ज्यूसमध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेची काळजी घेतात. हे त्वचेला हायड्रेटेड आणि ग्लोइंग ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे हिवाळ्यातही तुमचा चेहरा तजेलदार दिसतो.

पचनक्रिया सुधारते

ABC ज्यूसमधील गाजर आणि बीट दोन्हीमध्ये भरपूर फायबर असतं, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. हा ज्यूस बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करण्यास मदत करतो आणि आतडे स्वच्छ करण्यास मदत करतो. या ज्यूसमुळे पोट हलकं राहून पचनक्रिया संतुलित राहण्यास मदत होते.

एनर्जी लेव्हल वाढते

हिवाळ्यात, शरीराला अनेकदा थकवा जाणवतो आणि एनर्जी लेव्हल कमी होऊ शकते. ABC ज्यूसमध्ये साखरेचा नैसर्गिक स्रोत असतो. ज्यामुळे शरीराला त्वरित एनर्जी मिळते. हा ज्यूस शरीर दिवसभर एक्टिव्ह ठेवण्यास मदत करतो.

वजन कमी करण्यास उपयुक्त

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी ABC ज्यूस खूप फायदेशीर ठरतो. गाजर आणि बीट सारख्या घटकांमध्ये कॅलरीज कमी असतातच, पण त्यामध्ये भरपूर फायबर देखील असतात, जे भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. ABC ज्यूसमुळे मेटाबॉलिज्म वाढतं आणि फॅट बर्न होण्यास मदत होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळेच लठ्ठपणा कमी करायचं असल्यास ABC ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो.

कधी प्यायचा एबीसी ज्यूस

एबीसी ज्यूसचा फायदा व्हावा असं वाटत असेल तर रोज एक ग्लास हा ज्यूस प्या. सकाळी उपाशीपोटी हा ज्यूस प्यायल्यास अधिक चांगला परिणाम होऊ शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

8 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

23 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago