मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात हुंड्याच्या पैशाच्या वादातून एकाचा खून

सात जणांवर परस्परविरोधी गुन्हे, एकाचा खून एक गंभीर

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे हुंड्याच्या पैशाच्या वादातून 2 गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडलेली असताना झालेल्या मारहाणीत देवा रमेश भोसले याचा मृत्यू होऊन मयूर उर्फ बाब्या सुधाकर काळे हा गंभीर जखमी झाला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मयूर उर्फ बाब्या सुधाकर काळे, रशिध कुंजीर भोसले, राहुल उर्फ मोदील कुंजीर भोसले, आकाश सुधाकर काळे, पप्पू रमेश भोसले, देवा रमेश भोसले, जयंतास रमेश भोसले यांच्या विरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सणसवाडी येथील पप्पू भोसले याच्या बहिणीचे लग्न 3 वर्षापूर्वी तळेगाव ढमढेरे येथील मयूर काळे याच्या सोबत झालेले असताना त्यांच्या समाजातील प्रथेप्रमाणे मयूर याने मुलीच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये देण्याचे ठरले होते. मात्र 3 वर्षात मयूर याने फक्त 80 हजार रुपये दिलेले होते. त्यामुळे त्यांच्यात वाद होत होता. १५ मे रोजी देखील सायंकाळच्या सुमारास मयूर काळे व आकाश काळे यांचा पप्पू भोसले याच्या सोबत वाद झाला. त्यावेळी त्यांनी आज तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी देऊन निघून गेले. त्यनंतर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मयूर काळे त्याच्या 3 साथीदारांसह भोसले यांच्या घरी आला. त्यावेळी त्यांच्यात लाकडी दांडके, खोरे, दगडांनी तुफान हाणामारी झाली.

दरम्यान मयूर भोसले व त्याच्या साथीदारांनी केलेल्या मारहाणीत देवा रमेश भोसले रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे याचा जागीच मृत्यू झाला तर पप्पू भोसले व त्याच्या दोघा भावांनी केलेल्या मारहाणीत मयूर उर्फ बाब्या सुधाकर काळे रा. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे हा गंभीर जखमी झाला असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

या घडलेल्या घटनेबाबत पप्पू रमेश भोसले (वय २५)  रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे व नंदिनी मयूर भोसले रा. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे परस्परविरोधी फिर्यादी दिल्या असल्याने शिक्रापूर पोलिसांनी मयूर उर्फ बाब्या सुधाकर काळे व आकाश सुधाकर काळे दोघे रा. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे, रशिध कुंजीर भोसले व राहुल उर्फ मोदील कुंजीर भोसले दोघे रा. पाठेठाण ता. दौंड जि. पुणे, पप्पू रमेश भोसले, देवा रमेश भोसले, जयंतास रमेश भोसले तिघे रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार व नितीन अतकरे हे करत आहे.

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट व पोलिसांचे कौतुक…

सणसवाडी (ता. शिरुर) येथे खून व खुनाच्या प्रयत्नाबाबत परस्परविरोधी गुन्हे दाखल होताच शिरुर उपविभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी यांनी घटनास्थळाला भेट दिली. मात्र यावेळी दोन्ही गुन्ह्यातील 5 आरोपी अटक तर 1 मयत आणि एकावर उपचार सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी सांगताच तातडीने 5 आरोपी अटक केल्याने त्यांनी शिक्रापूर पोलिसांच्या पथकांचे कौतुक केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आढळरावांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही; सचिन अहिर

वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात…

1 दिवस ago

इंडिया आघाडी अतिरेक्यांची भाषा बोलू लागली; देवेंद्र फडणवीस

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी शिरुर येथे मंगळवार…

1 दिवस ago

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिरुर (तेजस फडके) 'गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवत आहात. तुम्ही १५ वर्षे खासदार असताना…

2 दिवस ago

शिरुर ग्रामीण मध्ये डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकत दोन गांजा विक्रेते तसेच गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर केली कारवाई

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औ‌द्योगीक वसाहतीमध्ये काही ठिकाणी अवैधरीत्या गांजाची चोरुन…

3 दिवस ago

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी संतोष सुभाष चौधरी यांनी विषारी औषध…

4 दिवस ago