मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकत दोन गांजा विक्रेते तसेच गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर केली कारवाई

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औ‌द्योगीक वसाहतीमध्ये काही ठिकाणी अवैधरीत्या गांजाची चोरुन विक्री होत असल्याबाबत माहिती पोलीस निरक्षक महादेव वाघमोडे यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार रांजणगाव तसेच कारेगाव या दोन ठिकाणी छापा टाकुन पोलिसांनी दोन गांजा विक्री करणाऱ्या व्यक्ती तसेच दोन गांजा ओढणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली आहे.

 

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीत कारेगाव हद्दीतील एका वस्तीमध्ये विजया शितोळे हि महिला गांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना दि 4 मे 2024 रोजी प्राप्त झाली होती. या माहितीच्या अनुषंगाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, महिला पोलीस उपनिरीक्षक सविता काळे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विजय सरजिने, महिला पोलिस हवालदार विद्या बनकर, चालक पोलिस हवालदार माऊली शिंदे व पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी दोन वेगवेगळी पथक तयार केली.

 

त्यानंतर रात्री 9:40 वाजता माहीती मिळाली त्या ठिकाणी छापा टाकला. सदर ठिकाणी महिला विजया पोपट शितोळे (वय 55) रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे हिच्या ताब्यात एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये गांजा हा अमली पदार्थ मिळुन आला. तसेच रांजणगाव येथील हेमंत पवार हा देखील अशाच प्रकारे गांजा विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पोलीस स्टाफमधील दोन्ही पथकाने सोबतच्या पंचासह राजंणगाव येथे मिळालेल्या बातमी ठिकाणी छापा टाकला.

 

सदर ठिकाणी हेमंत पवार (रा. रांजणगाव, ता. शिरुर, जि. पुणे) याच्या घरी गांजा हा अमली पदार्थ मिळुन आला. रांजणगाव MIDC पोलीसांनी दोन्ही ठिकाणावरुन गांजा जप्त केला आहे. सदर घटनेबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे अंमली पदार्थ कायद्यान्वये वरील दोन व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तसेच रांजणगाव MIDC परिसरातील कारेगावच्या हद्दीतील आय टी आय (ITI) शेजारी काही इसम नेहमीच गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याबाबत पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना बातमी मिळाल्याने अधिक माहिती घेवुन बातमी खरी असल्याची खात्री केली असता पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी पोलीस निरिक्षक यांनी सोबतच्या पंचासह दि 4 मे 2024 रोजी रात्रीच्यावेळी छापा टाकला असता सदर ठिकाणी 1) सोमनाथ दत्तात्रय नवले (वय 31), 2) प्रथमेश संतोष नवले (वय 21) दोघेही रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे हे चिलीमद्वारे गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करतांना मिळुन आल्याने वरील दोघांविरोधात रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे गुन्हा अंमली पदार्थ का‌द्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, महिला पोलीस उपनिरीक्षक सविता काळे, पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विजय सरजिने, महिला पोलिस हवालदार विद्या बनकर, महिला पोलिस कॉन्स्टेबल कोमल सात्रस, चालक पोलिस हवालदार माऊली शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे व पोलिस हवालदार अभिमान कोळेकर हे करत आहेत.

रांजणगाव MIDC परिसरात कोयत्याचा धाक दाखवुन मोबाईल चोरी करणा-या तीन सराईत आरोपींना अटक

रांजणगावचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांचा निरोप समारंभ; कर्मचाऱ्यांसह उपस्थितांचे डोळे पाणावले

शिरुर तालुक्यातील तिनही पोलिस स्टेशन हद्दीत ग्रामसुरक्षा दल कार्यान्वित करण्याबाबत DYSP नी घेतली बैठक

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

11 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

12 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

6 दिवस ago