मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात कंटेनर इलेक्ट्रिक पोलला धडकून कंटेनर मधील २१ लाखाचे पार्सल जळून खाक…

शिरूर ( अरुणकुमार मोटे):  पनीतून पार्सल माल भरुन कोईमतूर येथे चालेल्या कंटेनरने शिरुर -चौफुला रस्त्यावर कर्डे गावाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या इलेक्ट्रीक पोलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कंटेनरचे डिझेल सांडून लागलेल्या आगीत कंटेनर व कंटेनर मधील पार्सल जळून खाक झाले असुन एकूण तब्बल २१ लाख रुपयांचे नूकसान झाले आहे. याबाबत कंटेनर चालकाच्या विरोधात शिरुर पॊलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात वायरमन हेमंत दिलीप वानखेडे (वय ३५) रा .बाबुराव नगर, शिरूर यांनी कंटेनर चालक कुप्पुरवामी आर. रामलिंगम रा. ईराबड़ी राको गाव ता. बोप्पीरेपटटी जि. धर्मापुरी राज्य तमिळनाडू यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.९ मार्च २०२५ रोजी सायंकाळी पावणे चारच्या सुमारास करडे, (ता. शिरूर) येथे हा अपघात झाला असुन. कंटेनर वरील चालक कुप्पुरवामी आर. रामलिंगम याच्या कडील कंटेनर क्र. एन. ५२ ए.ए. १२२७ सेफ एक्स्प्रेस प्रा. लि. रांजणगाव गणपती (ता. शिरूर) जि. पुणे या कंपनीतून पार्सल माल भरला व हे पार्सल रांजणगाव, कारेगाव, न्हावरा फाटा, चौफुला मार्गे कोईमतुर कडे घेवून जात असताना करडे गावचे पुढे भारत पेट्रोल पंप पास करून पुढे चौफुल्याकडे जात असताना वाहनचालकाने रोडच्या कडेला असलेल्या इलेक्ट्रीक पोलला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघात इलेक्ट्रीक पोलवरील तारांचे घर्षण होऊन त्याच्या ठिणग्या खाली पडून जमिनी वरील गवतावर पडल्याने गवत जळाले.

तसेच कटेनरमधील डीझेल खाली सांडून कंटेनरला आग लागली व कंटेनर व त्यातील संपुर्ण पार्सल माल जळुन गेला व सुमारे २१ लाखाचे नूकसान झाले आहे. ईलेक्ट्रीक पोल व तारांचे तुटुन अंदाजे तीस हजार रूपयाचे नुकसान झाले आहे. याबाबत आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बनकर करत आहेत .

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

14 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

20 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

20 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

21 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

21 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

21 तास ago