शिरूर ( अरुणकुमार मोटे): पनीतून पार्सल माल भरुन कोईमतूर येथे चालेल्या कंटेनरने शिरुर -चौफुला रस्त्यावर कर्डे गावाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या इलेक्ट्रीक पोलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कंटेनरचे डिझेल सांडून लागलेल्या आगीत कंटेनर व कंटेनर मधील पार्सल जळून खाक झाले असुन एकूण तब्बल २१ लाख रुपयांचे नूकसान झाले आहे. याबाबत कंटेनर चालकाच्या विरोधात शिरुर पॊलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात वायरमन हेमंत दिलीप वानखेडे (वय ३५) रा .बाबुराव नगर, शिरूर यांनी कंटेनर चालक कुप्पुरवामी आर. रामलिंगम रा. ईराबड़ी राको गाव ता. बोप्पीरेपटटी जि. धर्मापुरी राज्य तमिळनाडू यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.९ मार्च २०२५ रोजी सायंकाळी पावणे चारच्या सुमारास करडे, (ता. शिरूर) येथे हा अपघात झाला असुन. कंटेनर वरील चालक कुप्पुरवामी आर. रामलिंगम याच्या कडील कंटेनर क्र. एन. ५२ ए.ए. १२२७ सेफ एक्स्प्रेस प्रा. लि. रांजणगाव गणपती (ता. शिरूर) जि. पुणे या कंपनीतून पार्सल माल भरला व हे पार्सल रांजणगाव, कारेगाव, न्हावरा फाटा, चौफुला मार्गे कोईमतुर कडे घेवून जात असताना करडे गावचे पुढे भारत पेट्रोल पंप पास करून पुढे चौफुल्याकडे जात असताना वाहनचालकाने रोडच्या कडेला असलेल्या इलेक्ट्रीक पोलला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघात इलेक्ट्रीक पोलवरील तारांचे घर्षण होऊन त्याच्या ठिणग्या खाली पडून जमिनी वरील गवतावर पडल्याने गवत जळाले.
तसेच कटेनरमधील डीझेल खाली सांडून कंटेनरला आग लागली व कंटेनर व त्यातील संपुर्ण पार्सल माल जळुन गेला व सुमारे २१ लाखाचे नूकसान झाले आहे. ईलेक्ट्रीक पोल व तारांचे तुटुन अंदाजे तीस हजार रूपयाचे नुकसान झाले आहे. याबाबत आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बनकर करत आहेत .