क्राईम

टेंपो व मोटार सायकलच्या धडकेत १ जण मृत्युमुखी, तर २ जण जखमी

शिरूर दि. १२ ( अरुणकुमार मोटे): शिरसगाव काटा, (ता. शिरूर) येथे मोटार सायकलला टेंम्पोने दिलेल्या धडकेत एक जण मृत्युमुखी पडला. तर दोन जण जखमी झाले आहेत. करणसिंग ग्यारसिंग जमरे (वय ४९ वर्ष ) रा. जरखडीया, जहूर, चितवल, बडवाणी जि. राजपुर, राज्य मध्य प्रदेश असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव असून टिकम जमरे व गेंदालाल जमरे हे दोघे जखमी झाले आहेत.

या संदर्भात शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात ११ मार्च रोजी सव्वाबाराचा सुमारास झाला . याबाबत रोहन अजित सरनोत (वय -३८) व्यवसाय, कॉन्टॅक्टर, रा. दौंड, ता. दौंड, जि. पुणे यांनी अज्ञात टेंम्पो वरील अज्ञात चालका विरोधात फिर्याद दिली आहे.

शिरसगाव काटा, (ता. शिरूर), जि. पुणे येथे अज्ञात टेंम्पोचा चालकाने रहदारीचे नियमांकडे दुर्लक्ष करून हयगईने व अविचाराने भरधाव वेगात टेंम्पो चालवून समोरून येत असलेल्या हिरो कंपनीची मोटरसायकल गाडी नं. एम. पी. ४६ झेड ए. ३९०१ ला धडक दिली . त्यात टिकम जमरे यास गंभीर दुखापत झाली . त्याच्यावर पुणे येथे उपचार सुरु आहेत तर गेंदालाल जमरे यास किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातात करणसिंग ग्यारसिंग जमरे (वय ४९) रा. जरखडीया, जहूर, चितवल, बडवाणी जि. राजपुर, राज्य मध्य प्रदेश याना गंभीर व किरकोळ दुखापत होवून ते मरण पावले .टेंपो वाहनचालक अपघाताची खबर न देता पळुन गेला आहे. या संदर्भात आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कदम करत आहे .

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

20 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago