मुख्य बातम्या

शिरूर शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा भव्य रूट मार्च

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील शांतता,व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शिरूर शहरात शिरूर पोलीस ठाण्याच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला.उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले शिरूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या रूट मार्चमध्ये ५ पोलीस अधिकारी, ४० पोलीस अंमलदार तसेच RAF कंपनीचे १ अधिकारी व ४० जवान सहभागी झाले होते.

हा रूट मार्च शिरूर पोलिस स्टेशन ते बीजे कॉर्नर,एसटी स्टँड, राम आळी, पाच कंदील चौक, जैन मंदिर, एसटी स्टँड, डंबे नाला, सोनार आळी,सुभाष चौक, हलवाई चौक,सरदार पेठ, मारुती आळी, लाटे आळी,शनी मंदिर या प्रमुख मार्गावरून पार पडली आहे.शहरातील नागरिकांनी पोलीस दलाचे स्वागत करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या रूट मार्चमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत नागरिकांमध्ये विश्वास व सुरक्षिततेची भावना दृढ झाल्याचे दिसून आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

21 तास ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

1 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

1 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

1 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

1 दिवस ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

2 दिवस ago