रांजणगाव गणपती (तेजस फडके): अकरा वर्षाची मुलगी जेवण करत नसल्याच्या कारणावरुन कारेगाव येथील एका महिलेने स्वतःच्या पोटच्या मुलीला बेदम मारहाण केल्याने कोमल आदित्य उत्तम (रा. बाभुळसर रोड, कारेगाव रोड, ता. शिरुर जि. पुणे) हिच्यावर रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोमल उत्तम हि महिला कारेगाव येथे राहण्यास असुन तिची 11 वर्षीय मुलगी जेवण करत नसल्याच्या कारणावरुन तिच्या आईने तिला लाकडी काठीने हातावर, पायावर,पाठीवर मारहाण केली तसेच लोखंडी चमच्याने हातावर व पायावर चटके दिले.
त्यानंतर हि मुलगी शाळेत गेल्यानंतर एका शिक्षिकेच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्या शिक्षिकेने रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला धाव घेतली. तसेच पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आणुन दिला. त्यानंतर संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात असुन रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विद्या बनकर या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
रांजणगाव MIDC तील फियाट कंपनीतुन 8 लाख 40 हजार रुपयांच्या गाडीच्या पार्टची चोरी
रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात नवनियुक्त PI महेश ढवान यांनी पदभार स्वीकारला; स्वागताला “तो” हजर
रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीत जबरी मारहाण करुन मोबाईल व रोख रक्कम चोरणारा आरोपी जेरबंद
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…
पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…