शिरुर (तेजस फडके): एका तरुणाला जुने भांडण मिटवण्याच्या बहाण्याने शिरुर येथे बोलावून तीन जणांनी लाथा, बुक्यांनी तसेच हातातील लोखंडी फायटरने बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईराज वाबळे, सिदार्थ शिंदे, निखील वाबळे सर्वजण (रा. म्हसने ता. पारनेर जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.२४ जुलै) दुपारी फिर्यादी अनिकेत दिलीप पठारे (वय २१ रा. वाडेगव्हाण ता. पारनेर जि. अहमदनगर) या तरुणाला आरोपींनी जुने भांडण मिटवायचे आहे असे सांगून बोलावून घेतले. ब्रेजा कारने (एमएच १६ सीक्यू ८३३१) आलेल्या तिघांनी पठारे या तरुणाला लाथा, बुक्यांनी व हातातील लोखंडी फायटरने उजव्या कानाच्या शेजारी मारहाण केली. तसेच शिवीगाळ व दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
सदरील घटना शिरूर येथील रेव्हेन्यू कॉलनी येथे घडली असून पठारे याच्या तक्रारीवरून शिरुर पोलीस स्टेशनमध्ये तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शिंदे करत आहेत.
शिरुर तालुक्यात इंस्टाग्राम अकाउंटला तलवारीचा फोटो ठेवल्याने युवकावर गुन्हा दाखल
शिरुर तालुक्यात पोटच्या मुलीला बेदम मारहाण; आईवर रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
रांजणगाव MIDC तील फियाट कंपनीतुन 8 लाख 40 हजार रुपयांच्या गाडीच्या पार्टची चोरी
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …