मुख्य बातम्या

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी प्रफुल्ल बोंबे तर उपाध्यक्षपदी सुनिल जिते

शिरुर (तेजस फडके) समाजात पत्रकार म्हणुन काम करत असताना आपली आर्थिक बाजु पहिली भक्कम असली पाहिजे. पत्रकार म्हणुन आपण जर आर्थिक हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न केला तर आपण लाचारी स्वीकारली असा त्याचा अर्थ होतो आणि जो माणुस लाचार असतो तो निर्भीड पत्रकारिता करुच शकत नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ समीर राजे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका कार्यकारणीची बैठक नुकतीच सविंदणे येथे नुकतीच पार पडली. यावेळी डॉ समीर राजे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी प्रफुल्ल बोंबे , उपाध्यक्षपदी सुनिल जिते तर कार्याध्यक्षपदी सागर रोकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ समीर राजे, पुणे जिल्हाध्यक्ष सचिन धुमाळ, पुणे विभागीय सदस्य अरुणकुमार मोटे, साहेबराव लोखंडे, माजी तालुकाध्यक्ष तेजस फडके उपस्थित होते.

 

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाची शिरुर तालुका कार्यकारणी पुढीलप्रमाणे

अध्यक्षः- प्रफुल्ल बोंबे ( दै. प्रभात)

उपाध्यक्षः- सुनिल जिते (दै.समर्थ भारत)

कार्याध्यक्षः- सागर रोकडे (दै. सकाळ)

सचिव/ संपर्कप्रमुखः- अर्जुन शेळके (दै. लोकन्याय संघर्ष)

कोषाध्यक्षः- किरण पिंगळे-शेलार (शिरुर तालुका डॉट कॉम)

प्रसिद्धीप्रमुखः- आबासाहेब थोरात (दै. पुढारी)

कार्यकारी समिती अध्यक्ष :- बाबा इनामदार (NTV न्युज)

शिरुर शहराध्यक्ष:- निलेश काळे (शिरुर कट्टा युट्युब चॅनल)

 

ज्यावेळी पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होतात. त्यावेळी पत्रकार संघटनेतील प्रत्येक सदस्यांनी त्या पत्रकाराच्या मागे ठाम उभं राहील पाहिजे. तसेच सत्तेमध्ये बसलेली लोक हि कोणाचीच नाहीत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पत्रकार संघटना म्हणजे कोणताही दबाव गट नाही. महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ हे एक कुटुंब आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या सदस्यांची आपण काळजी घेतली पाहिजे.

तसेच आपल्या कुटुंबातील व्यक्तीवर म्हणजेच एखाद्या पत्रकारावर जेव्हा वाईट वेळ येईल तेव्हा आपण तेवढ्याच ताकतीने त्याच्या पाठीमागे उभं राहील पाहिजे. शिरुर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन त्यांनी तालुक्यातील पत्रकारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांवर दबाव टाकण्यासाठी दाखल होणाऱ्या खोट्या तक्रारीबाबत शहानिशा करुन पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करावे.

समीर राजे (राजाध्यक्ष)

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ

 

शिरुर तालुक्यातील अनेक पत्रकारांना ग्रामीण भागात काम करताना विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. अनेकवेळा प्रशासन किंवा राजकीय व्यक्तीच्या माध्यमातून पत्रकारांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार शिरुर तालुक्यात वाढतं असुन याबाबत आम्ही संघटनेच्या माध्यमातुन पत्रकारांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार आहोत.

प्रफुल्ल बोंबे (तालुकाध्यक्ष)

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ, शिरुर तालुका 

शिरुर; बाभुळसरच्या श्रावणी वाळके’ ला पिपसाईट एअर रायफल प्रकारात राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक

शिरुरच्या पुर्व भागातील पिंपळसुटी गावात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

शिरुर तालुक्यात अवैध वाळु उपशामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता…?

शिरुर तालुक्यात विधानसभा निवडणुकीनंतर सगळीकडे अवैध धंद्याचा सुळसुळाट…?

रांजणगाव गणपती येथील सुदामराव कुटे यांचं निधन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

22 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago