मुख्य बातम्या

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतला नियोजनाचा आढावा

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) सह पेरणे फाटा येथे एक जानेवारी २०२३ या शौर्यदिनी आयोजित जयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी अंतिम टप्यात असून पोलीस आयुक्त रितेश कुमार व पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जयस्तंभ परिसराला भेट देऊन सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा घेतला आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) सह पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेताना पोलीस आयुक्त रितेश कुमार व पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार किरण सुरवसे यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर, शौचालय, वाहनतळ, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तसेच आरोग्य विभागाच्या वतीने औषधे, मास्क आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून एकूणच सर्व विभागाच्या वतीने नियोजना प्रमाणे करण्यात येत आहेत.

तसेच शनिवारपर्यंत सर्व तयारी पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहे. तर जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्य राखीव दलाच्या ७ तुकड्या बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेल्या आहेत. पोलीस विभागाच्या वतीने उत्तम पद्धतीने बंदोबस्त करण्यात येणार असून नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी केले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण व कार्यकारी अभियंता अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात सुविधा निर्माण करण्यात येत असून जयस्तंभ फुलांनी सजविण्यात येत आहे. चारही बाजुंनी बॅरिकेट तसेच महिलांसाठी हिरकणी कक्ष आणि स्वतंत्र तात्पुरत्या स्वच्छता गृहाची व्यवस्था करण्यात आली असून परिसरात नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

13 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

17 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

17 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

17 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

17 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

18 तास ago