रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाढत्या चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी सक्रिय पावले उचलली आहेत. औद्योगिक वसाहतीमुळे येथे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असून, सुरक्षेच्या दृष्टीने ‘ग्रामसुरक्षा दल’ कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दि ५ जुलै २०२५ रोजी पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनतर्फे एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये परिसरातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसुरक्षा दलातील तरुण सहभागी झाले होते.
या बैठकीत गावांमध्ये CCTV कॅमेरे बसविणे, तसेच पोलीस आणि ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने रात्रगस्त करणे, अशी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. गावातील मुख्य चौक, धार्मिक स्थळे, वर्दळीची ठिकाणे येथे कॅमेरे बसविण्याचे आवाहन करण्यात आले, ज्याला ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
या बैठकीत करंजावणे गावातील २५ तरुणांना टि-शर्ट, लाठी व शिट्टीचे वाटप पोलिस निरीक्षक वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामसुरक्षा दलात सहभागी होण्यासाठी अधिक तरुणांनी पुढे यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
यावेळी भांबार्डे, बाभुळसर खुर्द, करंजावणे, खंडाळे, गणेगाव खालसा, वाघाळे, पिंपरी दुमाला, कर्डेलवाडी आदी गावांतील प्रतिनिधींनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. पोलिसांच्या या उपक्रमामुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्था सुधारण्यास मोठा हातभार लागणार आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह? पोलिसांना मलिदा मिळाला का…?
शिरुर; गंभीर गुन्ह्यातील माजी पंचायत समिती सदस्याला अटक करण्यासाठी शिरुर पोलिसांना सापडेना मुहूर्त…?
शिरुर; अनाथांच्या हाकेला तरुणांची साथ माहेर संस्थेतील विद्यार्थ्यांना कपडे, पुस्तकं आणि भोजन
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…