शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील माहेर संस्थेतील अनाथ मुलांच्या हाकेला प्रतिसाद देत शिरुर तालुक्यातील अनेक तरुणांनी एकत्र येत १४ विद्यार्थ्यांना कॉलेजचे ड्रेस, ११वी आणि १२वी च्या ७ विद्यार्थ्यांना पुस्तके आणि सर्व मुलांना भोजन उपलब्ध करुन दिले.
शिरुर येथील माहेर संस्थेचे वसतीगृह सध्या ३५ अनाथ मुलांना निवारा व शिक्षणासाठी मदत करत आहे. शासकीय अनुदान नसल्याने हि संस्था पुर्णपणे दातृत्वावर आधारित आहे. याच पार्श्वभूमीवर संस्थेतील विशाल सर यांनी जयवंत भगत यांच्याकडे मदतीची विनंती केली. भगत यांनी ही गरज व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे शेअर केली आणि या डिजिटल आवाहनाला त्वरित प्रतिसाद मिळाला.
सर्वप्रथम प्रशांत वाळुंज यांनी एका विद्यार्थ्याच्या ड्रेससाठी मदत केली. त्यानंतर निर्वी येथील शाम शेलार, गणेश शेलार, सरपंच मनिषा शरद पवार, शरद बाळासाहेब पवार, नंदकुमार सोनवणे, गुनाट येथील ॲड गणेश करपे, माऊली करपे, दत्तात्रय भगत, रामदास करपे, रमेश गाडे, ग्राम महसूल अधिकारी गणेश बिघोत, देवदैठण येथील संदीप घावटे, उरळगाव येथील अनिल सात्रस, शेवगाव येथील सायली भुजबळ, निमोणे गावचे माजी सरपंच संजय काळे आणि मंडळ कृषी अधिकारी अनिल पाटील यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.
या सर्वांनी मिळून १४ विद्यार्थ्यांना कॉलेज युनिफॉर्म, ११ वी तील ४ व १२ वी तील ३ विद्यार्थ्यांना संपुर्ण पुस्तक संच, तसेच दहावीतील विद्यार्थ्यांना नकाशा व वह्यांसह शैक्षणिक साहित्य दिले. तर शिरुर येथील अनुराधा कलेक्शन यांनी कपड्यांच्या खरेदीत तर करडे येथील श्रावणी जनरल स्टोअर्स यांनी पुस्तक खरेदीत योगदान दिले.
या उपक्रमातुन सामाजिक माध्यमांचा विधायक उपयोग कसा करता येतो, याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. दोन जीबी डेटा रील्स बघण्यात संपवणारा समाज आणि सोशल मीडियाचा वापर करून अनाथ मुलांना आधार देणारा समाज यातील फरक अधोरेखित झाला आहे.
यावेळी संदीप घावटे सर, प्रशांत वाळुंज सर, अनिल पाटील (मंडळ कृषी अधिकारी) आणि जयवंत भगत (सहाय्यक कृषी अधिकारी) यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व संस्काराचे महत्त्व अधोरेखित करणारे विचार मांडले. या स्तुत्य उपक्रमासाठी मदत करणाऱ्या सर्वांनी समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह? पोलिसांना मलिदा मिळाला का…?
शिरुर; गंभीर गुन्ह्यातील माजी पंचायत समिती सदस्याला अटक करण्यासाठी शिरुर पोलिसांना सापडेना मुहूर्त…?
शिरूरच्या भूमी अभिलेख कार्यालयात खुलेआम लाचखोरीचा सुळसुळाट; खाजगी कर्मचारी साहेबांचा खास माणूस
‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…
बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…
पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…
मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…
नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…