Shirur Police Station

शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह? पोलिसांना ‘मलिदा’ मिळाला का…

क्राईम मुख्य बातम्या

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्याच्या बेट भागातील कवठे येमाई गावात एका ४२ वर्षीय सामाजिक कार्यकर्त्याला सात जणांनी जमिनीच्या वादातुन मारहाण केली होती. त्यात एका माजी पंचायत समिती सदस्यावर गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल झाला होता. मारहाणीची घटना घडल्यानंतर शिरुर पोलिसांनी सात पैकी तीन आरोपींना अटकही केली होती. तसेच शिरुर न्यायालयाने त्यांना सात दिवस पोलिस कोठडी दिली होती. ३० जुन २०२५ रोजी त्यांना जामीन मंजूर झाला आहे.

परंतु, यातील मुख्य आरोपी असलेला माजी पंचायत समिती सदस्य मात्र मोकाट फिरत होता. विशेष म्हणजे सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावत होता. त्यामुळेच शिरुर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या माजी पंचायत समिती सदस्यावर गंभीर गुन्हा दाखल असतानाही तो सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावत होता. त्यामुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपी राजरोसपणे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत असताना शिरुर पोलिस झोपा काढत होते का…? किंवा पोलिसांवर राजकीय दबाव होता…? कि पोलिसांना ‘मलिदा’ मिळाला अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

याबाबत रमेश दशरथ वागदरे (वय ४२, सध्या रा. पडाळवाडी ता. खेड जि.पुणे मुळ रा. कवठे येमाई ता. शिरुर जि.पुणे) यांना जमिनीच्या वादातुन गंभीर मारहाण केल्याप्रकरणी सुभाष रामचंद्र पोकळे, किसन हिलाल, विकास देवकर, सोनु कैलास कोळपे, मुंकुद सुरेश घोडे, उत्तम नथू जाधव, संपत सुखदेव पोकळे या सात जणांवर शिरुर पोलिस स्टेशन येथे दि १७ जुन २०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. या मारहाणीत फिर्यादी रमेश वागदरे यांचा डावा पाय व दोन्ही हात फॅक्चर झाले आहेत. सध्या त्यांच्यावर राजगुरुनगर येथील खाजगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. या घटनेचा पुढील अधिक तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार वारे हे करत आहेत.

सात आरोपींपैकी मुख्य आरोपी हा माजी पंचायत समिती सदस्य असून राजकीय दबावमुळे त्याला पोलिसांनी अटक केली नाही. तसेच तो राजरोसपणे सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावत भाषणे ठोकत असताना शिरुर पोलिसांनी मात्र बघ्याची भुमिका घेतली अशी दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्यामुळे शिरुर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह…? निर्माण झाले असून राजकारणी लोकांना वेगळा न्याय आणि गरीबांना वेगळा न्याय आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य लोक विचारत आहेत.

शिरुर पोलिसांची प्रतिमा सुधारणार का…?
करडे येथील एका माजी सैनिकाची आर्थिक फसवणुक झालेली असताना शिरुर पोलिस स्टेशन मधील एका अधिकारी आणि कर्मचाऱ्याने आरोपीला मदत केल्याच्या कारणावरुन तत्कालीन पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करत त्यांची मुख्यालयात बदली केली होती. तसेच सामाजिक कार्यकर्त्याला गंभीर मारहाण करुन मुख्य आरोपी मोकाट फिरत असेल तर पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल्ल याची दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का…? हे येणारा काळचं ठरवेल.

शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे येथे छप्पराच्या गोठ्यातून अज्ञात चोरट्यांकडून म्हैस लंपास

शिरूर शहरातून चोरीस गेलेली मोटारसायकल परजिल्ह्यातून हस्तगत…

गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसेसह एकजण अटकेत; शिरूर पोलीसांची धडक कारवाई

शिरूर! डॉक्टर पत्नीला मारहाण करणाऱ्या सासरच्या मंडळींविरूद्ध गुन्हा दाखल…

शिरूरमध्ये मोठा गुटखा साठा उघड; १.१६ लाख रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखू जप्त