कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथे भाड्याने राहणाऱ्या एका 50 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरुन खून केला. त्यानंतर तो फरार झाला होता. आरोपी पळुन जाण्याच्या तयारीत असताना रांजणगाव MIDC पोलिसांनी त्याला चार तासात तात्काळ अटक केली आहे. अशोक भिमराव रंधवे (वय 50) रा. नेवासाफाटा ता.नेवासा जि. अहमदनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारेगाव येथील विठ्ठलमंदिराजवळ असणाऱ्या एका इमारतीच्या वरच्या खोलीमध्ये आरोपी अशोक भिमराव रंधवे (वय 50) आणि त्याची पत्नी सविता अशोक रंधवे (वय 45) रा.नेवासाफाटा ता. नेवासा जि. अहमदनगर हे दोघे राहत होते. अशोक रंधवे याने पत्नी सविता वर्षे हिचा दि. 7 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास चारित्र्यावर संशय घेउन डोक्यात कपाळावर लोखंडी टिकावाने मारुन तिला गंभिर जखमी करुत तिचा खुन केला. याबाबत सचिन दिलीप कातकाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अशोक रंधवे याच्या विरुध्द रांजणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी अशोक रंधवे याने पत्नीचा खून केल्यानंतर त्याचा जावई सचिन कातकाडे याला फोन करुन ‘तुमची मामी सविता रंधवे हिचा मर्डर केला आहे. तुम्ही तिचा शेवटचा चेहरा बघुन जा’ असे सांगितले. त्यानंतर जावई सचिन यांनी सदरची माहीती पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक महेश ढवाण, सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरडे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार संदिप जगदाळे, कल्पेश राखोंडे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, प्रतिक खरबस यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता सदर रुममध्ये सविता रंधवे यांचा मृतदेह पोलीसांना मिळुन आला.
यातील आरोपी अशोक रंधवे हा खुन केल्यानंतर फरार झाला होता. त्याचा शोध घेण्याबाबत पोलीस निरिक्षक महेश ढवाण यांनी तपास पथकातील दत्तात्रय शिंदे, विजय शिंदे, उमेश कुतवळ यांना सुचना दिल्या होत्या. अशोक रंधवे यास दारु पिण्याचे व्यसन असल्याने तपास पथकातिल दत्तात्रय शिंदे, विजय शिंदे यांनी त्याचा दारु अड्ड्यावर शोध घेतला पंरतु तो मिळुन येत नव्हता. सदरचा हा आरोपी शिरुर शहरात फिरत असल्याची गोपनीय माहिती बातमि महेश ढवाण यांना मिळाल्यानंतर ते स्वतः तसेच अनिल मोरडे, दत्तात्रय शिंदे, विलास आंबेकर, पांडुरंग साबळे, विजय शिंदे, यांनी संपुर्ण शिरुर शहरात आरोपीचा शोध घेतला तसेच तांत्रिक विश्लेषन करुन शिरुर शहरातील सी टी बोरा कॉलेज समोरील मोकळ्या जागेत आरोपी अशोक रंधवे याला अवघ्या चार तासात ताब्यात घेतले.
सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, कल्पेश राखोंडे, संदिप जगदाळे, पांडुरंग साबळे यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे हे करत आहेत.
स्वकमाईने दिली कुटुंबाला मर्सिडीज गाडी भेट;सणसवाडी येथील तरुणाची कामगिरीच ग्रेट
शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…
अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…