स्वकमाईने दिली कुटुंबाला मर्सिडीज गाडी भेट…सणसवाडी येथील तरुणाची कामगिरीच ग्रेट

मुख्य बातम्या शिरूर तालुका

कोरेगाव भिमा (प्रतिनिधी) सणसवाडी (ता.शिरुर) येथील तिशीतील तरुणाने रात्रंदिवस कष्ट करत व्यवसाय उभा केला आणि स्वकष्टाच्या कमाईवर आयुष्याला आकार देणाऱ्या कुटुंबाचे ऋण व्यक्त करण्यासाठी उद्योजक मयूर दरेकर यांनी वडिलांच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबीयांना मर्सिडीज गाडी भेट दिली आहे. तरुणाच्या या अनोख्या भेटीची सध्या पुणे जिल्ह्यात जोरदार चर्चा असून कुटुंबाला मर्सिडीज गाडी भेट देताना व्हायरल झालेल्या फोटोत कुटुबियांच्या चेहऱ्यावरील आनंद, अभिमान, प्रेम, आश्चर्य असे सर्व काही भाव एकत्रित दिसत आहे.

 

सणसवाडी येथील मयूर दरेकर या उच्चशिक्षित तरुणाने लंडन येथील नामांकित विद्यापीठात एम बी ए चे उच्च शिक्षण घेतले. बाहेरच्या देशात पगाराच्या गलेलठ्ठ पॅकेज मिळत असूनही कुटुंबियांच्या सोबत राहून माता, माती, कुटुंब आणि गावाची ओढ यामुळे भल्या मोठ्या पगाराची नोकरी नाकारुन स्वतःचा व्यवसाय सुरु केला. यात रात्रंदिवस कष्ट घेतले. या व्यवसायात अनेकांना रोजगार देत आहे. तसेच देशातील मोठ मोठ्या ब्रँड असणाऱ्या कंपन्यांना सेवा पूर्वत असून उत्तम दर्जेदार काम, विनयशीलता, उत्तम दर्जाचे मटेरियल,आधुनिक डिझाईन, वेळेवर मिळणारी सुविधा, चोवीस तास ग्राहक सुविधा तसेच योग्य भाव व गुणवत्तापूर्ण सेवा यामुळे मयूर दरेकर यांनी अल्पावधीतच व्यवसायात आपला जम बसवला.

 

सणसवाडी येथील वारकरी संप्रदायाचा वसा असणारे शेतकरी कुटुंब म्हणजे दरेकर कुटुंब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला पंचायत समिती सदस्या सविता दरेकर तर मनसे पुणे जिल्हा प्रमुख रामदास दरेकर हे आई वडील तर चुलती पुणे जिल्हा सरपंच परिषदेच्या महिला अध्यक्षा आणि उद्योगनगरी सणसवाडी गावच्या माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सुनंदा नवनाथ दरेकर या व चुलते उद्योजक नवनाथ दरेकर असे हे कुटुंब सामाजिक ,राजकीय,अध्यात्मिक, शैक्षणिक, कृषी ,सहकार, धार्मिक क्षेत्रात आघाडीवर असून माणुसकी धर्माचे पालन करत इतरांना मदतीचा हात देणारे व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होत मानवता धर्म जपणारे कुटुंब आहे. मातीशी नाळ जपणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने आपल्या एकत्रित कुटुंबाला मर्सिडीज गाडी भेट दिल्याने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

या कुटुंबाच्या पाठिंब्यावर मयूरने विदेशात उच्च शिक्षण आणि व्यवसायात यशस्वीरित्या वाटचाल करत असून आयुष्याचा पाया भक्कम करत उत्तम दर्जाचे शिक्षण घेत संस्कार व माणुसकी धर्म जीवनात रुजवला तसेच कुटुंबाने प्रामाणिक कष्ट करायचे हा संस्कार रुजवल्याने आज आपण आयुष्यात उद्योगात यशस्वी वाटचाल करत आहोत आणि हीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व ज्यांनी माझे आयुष्य सोनेरी बनवले म्हणजे परिपूर्ण सुखसंपंन्न बनवले अशा कुटुंबाचे ऋण व्यक्त करण्यासाठी मर्सिडीज गाडी कुटुंबाला भेट दिली असल्याची भावना उद्योजक मयूर दरेकर यांनी व्यक्त केली.

 

जमिन विकून नव्हे तर कष्टातून भेट दिली कार…
सध्या सणसवाडी गाव हे औद्योगिक दृष्ट्या विकसित झालं असुन या परिसरात अनेक मल्टीनॅशनल कंपन्या येत आहेत. तसेच शहरीकरणा बरोबरच प्लॉटिंग वाढत आहे. त्यामुळे येथील शेत जमिनीचे भाव गगनाला भिडले असुन त्या विकून दादा ,भाई, आमच काळजी अशा बिरुदावली मिरवत तरुणाई आलिशान गाडी, सोन्याचे दागिने, महागडे मोबाईल, गॉगल, बुट व कपडे अशा वातावरणात गुरफटत असताना मयूर दरेकर हा तरुण स्वकष्टाने रात्रंदिवस उद्योग उभा करतो आणि एकत्रित असणाऱ्या कुटुंबाला महागडी मर्सिडीज गाडी भेट देतो हाच मोलाचा कृतियुक्त संदेश आहे.

 

एकत्रित कुटुंबच सर्वांगीण प्रगतीचा कणा…
वारकरी संप्रदायाचे पाईक असणाऱ्या शेतकरी वडील सोपानराव दरेकर व आई यमुना दरेकर मुलगा रामदास व सूनबाई सविता त्यांचा मुलगा मयूर दरेकर त्यांची पत्नी डॉ सायली दरेकर, दुसरा मुलगा प्रसिद्ध गाडा मालक व फायनल सम्राट लक्ष्मण व सूनबाई उषा दरेकर,तिसरा मुलगा नवनाथ व सूनबाई सुनंदा दरेकर यांनी अहोरात्र कष्ट करत प्रपंच उभा केला. मुलांना उच्च शिक्षित केले कष्ट… कष्ट आणि कष्ट हा मूलमंत्र जपत कुटुंबाची वाटचाल सुरू ठेवली आणि त्याच कुटुंबातील अवघ्या तिशीत आपल्या परिसासारख्या अनमोल कुटुंबाला महागडी मर्चडीस गाडी भेट आपले ऋण व्यक्त केले.

 

आजकाल थोडी प्रगती झाली की कुटुंबे विभक्त होताना दिसत आहेत. पण दरेकर कुटुंबीय आजही एकत्रित असून त्यांची एकत्रित कुटुंबपद्धती हिच प्रगतीचा कणा असून सर्वांगीण प्रगती करत आहेत. त्यामुळे मयुर याने वडील मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण दरेकर कुटुंबाला मर्चडिस गाडी भेट देऊन समाजात एक आगळावेगळा संदेश दिला आहे.