मुख्य बातम्या

रांजणगाव पोलीस स्टेशन कडील बलात्कारासह पोस्को गुन्ह्यातील आरोपीस २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन (Ranjangaon MIDC Police Steshan) गुन्हा रजि नं ३२६/२०२० पोस्को तसेच ॲट्रॉसिटी कायद्याअन्वये दि १२ ऑक्टोबर २०२० रोजी पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला पुणे सत्र न्यायालयाने दि १७ डिसेंबर २०२४ रोजी आरोपी महेश श्रीहरी लटपटे (वय २४) यास २० वर्षे सश्रम कारावासाची व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

 

याबाबत रांजणगाव पोलिसांनी (Ranjangaon Police) दिलेल्या माहितीनुसार सदर गुन्हयातील आरोपी महेश श्रीहरी लटपटे (वय २४) मुळ रा. लाडेवडगाव, ता. केज, जि.बीड याच्याविरुध्द गुन्ह्याचे तपासी अधिकारी दौंड विभागाचे (तत्कालीन) उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी सखोल तपास करुन विशेष न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे कोर्टात पुराव्यासह दोषारोपपत्र दाखल केले होते.

 

सदर केसची सुनावणी चालु असतांना आरोपीने जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालय यांच्या कोर्टात अर्ज दाखल केला असता कोर्टाने सदरचा अर्ज रद्द केल्याने आरोपीने जामीनासाठी दिल्ली सुप्रिम कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यावेळी शिरुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करत वेळवेळी सदर केसमध्ये पाठपुरावा केल्याने सदर आरोपीचा जामीन अर्ज रद्द झाला होता.

 

तसेच सदर केसच्या सुनावणी दरम्यान गुन्ह्यातील साक्षीदार यांना रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनचे (Ranjangaon MIDC Police Steshan) पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी साक्षीदार यांना वेळेत कोर्टात हजर ठेवुन पाठपुरावा केला होता. साक्षी पुराव्याचे आधारे पुणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस आर नरवडे यांनी दि १७ डिसेंबर २०२४ रोजी आरोपी महेश श्रीहरी लटपटे (वय २४) याला २० वर्षे सश्रम कारावासाची तसेच ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

 

सदर केसमध्ये सरकारी वकील अँड भारती कदम, केस अधिकारी पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, कोर्ट पैरवी अंमलदार पोलिस हवालदार आप्पासाहेब सुर्यवंशी, पुणे सेशन कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक वि‌द्याधर निचीत, जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी काम पाहिले आहे.

शिरुर तालुक्यात भरधाव ट्रॅक्टर झोपडीत शिरल्याने पती-पत्नीचा मृत्यू

शिरुर तालुक्यात पती-पत्नीची एकमेकांच्या नातेवाईकांच्या विरोधात मारहाणीची फिर्याद

शिरूर! दिगांबर सायकल नसल्याने शाळेत पायी यायचा; उपचारादरम्यान मृत्यू

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

15 मिनिटे ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

18 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

21 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

21 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

21 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

22 तास ago