आरोग्य

बाटलीबंद पाणी आरोग्यासाठी घातक! मिनरल वॉटरच्या नावावर २० रुपयांना विकलं जातं ‘विष’

तहान लागल्यावर घराबाहेर असताना साधारणपणे बहुतेक लोक बाहेर त्यांच्या आरोग्याचा विचार करुन बाटलीबंद पाणी घेतात. ज्यावर ‘मिनरल वाॅटर’ असे लिहिलेले असेल. सामान्यतः चांगल्या दर्जाची असल्याचा दावा करणाऱ्या कंपनीची सीलबंद पाण्याची बाटली २० रुपयांना मिळते.पण हे बाटलीबंद पाणी तुमच्या आरोग्यासाठी विषापेक्षा कमी नाही याची तुम्हाला जाणीवही नसेल. बाटलीबंद पेय आणि मिनरल वाॅटर आरोग्यासाठी घातक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारने अशा मिनरल वाॅटरला ‘हाय रिक्स’ श्रेणीत ठेवले आहे.

ट्रेन, बस किंवा फक्त प्रवास करताना तुम्ही जे मिनरल वॉटर पाणी पिता ते तुमच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक असू शकतं. केंद्र सरकारच्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस अथॉरिटीने (एफएसएसए) सोमवारी बाटलीबंद केलेले पेय आणि मिनरल वॉटरला हाय रिस्क खाद्यपदार्थांच्या श्रेणीमध्ये टाकलं. त्यामुळे आता बाटलीबंद पाण्याची अनिवार्य तपासणी केली जाणार आहे. केंद्र सरकारने पॅकेज्ड आणि मिनरल वॉटर उद्योगासाठी भारतीय मानक ब्युरोकडून प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनिवार्य अट काढून टाकल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने बाटलीबंद केलेले पेय आणि हाय रिस्क श्रेणीमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, याचा अर्थ आता या उत्पादनांच्या गुणवत्तेवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल आणि त्यांची तपासणी केली जाईल आणि थर्ड पार्टी आॅडिट केले जाईल. एफएसएसएसए आयचा हा निर्णय म्हणजे बाटलीबंद पाणी किती सुरक्षित आहे याचा पुरावा देत आहे. दुसरीकडे, पॅकेज्ड ड्रिंककिंग वाॅटर व्यावसायिकांनी यापूर्वी सरकारकारकडे नियम सुलभ करण्याची मागणी केली होती.बीआयएस आणि एफएसएस आय या दोघांना दुहेरी प्रमाणीकरणाची आवश्यकता काढून टाकण्याची विनंती करण्यात आली होती. तज्ज्ञांचे मत आहे की नवीन नियम प्रकिया सुव्यवस्थित करण्यास आणि उत्पादकांवरील भार कमी करण्यास मदत करु शकतात.

बाटल्यांमध्ये पॅक केलेल्या पाण्यात प्लास्टिकमधील रसायने मिसळू शकतात, जी आरोग्यासाठी हानिकारक असतात. बीपीए (बिस्फेनाॅल एक) सारख्या बाटल्यांमध्ये असलेली रसायने, त्याच बाटलीमध्ये पाणी जास्त काळ ठेवल्यास फॅथलेट्स पाण्यात विरघळू शकतात. रसायनांचे सेवन केल्यावर कर्करोग आणि इतर गंभीर इतर गंभीर आजार होऊ शकतात. नैसर्गिक स्त्रोतांमधून येणाऱ्या पाण्यामध्ये सामान्यतः कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी आवश्यक खनिजे असतात. जी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.परंतु बाटलीबंद पाण्यांत या खनिजांची कमतरता असू शकते. कारण पाणी शुध्द करण्याच्या प्रक्रियेत ही पोषकतत्वे नष्ट होतात.

बाटलीबंद पाण्यात मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले आहेत, जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत. हे छोटे प्लास्टिकचे कण शरीरात प्रवेश करु शकतात आणि पोट, आतडे आणि इतर अवयवांमध्ये जमा होऊ शकतात. त्यामुळे पचनसंस्थेशी संबंधित समस्या, कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढण्याची शक्यता आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री महामार्गावर धुडगूस; शिरुरच्या DB पथकाने २४ तासांत मुसक्या आवळल्या

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून चालक आणि वाहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत…

24 मिनिटे ago

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

4 तास ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

19 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

19 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

19 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

19 तास ago