मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात मारहाण करुन जबरी दरोडा; सोन्याच्या झुब्यासाठी महिलेचे कान कापले

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सोमवार (दि २५) रोजी रात्री १:३० च्या सुमारास दरोडा टाकुन एका महिलेला जबर मारहाण करुन तिच्या कानातील सोन्याचे ऐवज चोरण्यासाठी तिने कान धारधार हत्याराने कापल्याची गंभीर घटना घडली असुन या प्रकारामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत सोपान करपे (वय ४८) रा. गुनाट (करपेवस्ती) ता.शिरुर, जि पुणे यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असुन चार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोपान करपे हे पत्नी सुमन, मुलगा राजेंद्र, सुन कल्पना, मुलगा आत्माराम, सुन ज्योती व नांतवाडासह गुनाट गावातील करपे वस्ती येथे राहत असुन शेती करुन कुटुबांची उपजिवीका करतात. सोपान करपे हे आळंदी येथे पायवारी करण्यासाठी गेले असल्याने दि २५ नोव्हेंबर २०२४ रोजी मध्यरात्री १:३० च्या सुमारास त्यांच्या पत्नी सुमन खोलीमध्ये एकट्याच दरवाजा ओढुन झोपल्या होत्या. तसेच शेजारच्या खोलीत त्यांची दोन मुले झोपली होती.

मध्यरात्री १:३० च्या सुमारास तोंडाला काळे मास्क लावलेले चार अज्ञात इसम घरात आले आणि त्यांनी अचानक सुमन करपे यांच्या तोंडावरील पांघरुन काढले. त्यावेळी त्या खुप घाबरल्या आणि त्यांनी ओरडण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यातील एका इसमाने त्यांचे तोंड दाबले आणि त्यांना हाताने व लाथाबुक्याने मारहान करण्यास सुरवात केली. तसेच जबरदस्तीने त्यांच्या गळ्‌याला चाकु लावत गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र काढुन घेतले.

पण कानातील सोन्याचे झुबे व वेल काढता येत नसल्याने चोरांनी कोणत्या तरी धारदार हत्याराच्या साह्याने त्यांचे दोन्ही कान खालील बाजुने कापुन झुबे व वेल काढुन घेतले. तसेच पेटीतील तीन हजारांची रोख रक्कम चोरी करुन घेवुन गेले. त्यावेळी मुलांचा मोठ्याने ओरडल्याचा आवाज आला. सुमन करपे या मुलांकडे गेल्या असता त्यांच्या खोलीला बाहेरुन कडी लावली होती. त्यांनी ती कडी काढली आणि मुले व सुना बाहेर आल्या. त्यांनंतर त्यांचा मुलगा राजेंद्र व आत्माराम त्यांना औषधोपचारासाठी दवाखाण्यात घेवुन गेले.

 

या दरोड्यात सोन्याचे मणी मंगळसुत्र, कानातील सोन्याचे झुबे व वेल आणि ५०० रुपयाच्या ६ नोटा अशी एकूण ६३ हजार रुपयांची चोरी झाली असुन या घटनेचा पुढील अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक गिरी हे करत आहेत. या घटनास्थळी पुण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक शिळीमकर, शिरुरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी भेट दिली.

पुणे-नगर महामार्गावर युवती किंवा महिलांना लिफ्ट देताय…? सावधान

दिलीप वळसे पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट; निवडीविषयी म्हणाले

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

2 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

2 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

2 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

11 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

11 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

11 तास ago