मुख्य बातम्या

दिलीप वळसे पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट; निवडीविषयी म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज (सोमवार) शरद पवार यांची भेट घेतली. दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती, त्यानिमित्त वाय.बी. चव्हाण प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार एकत्र आले होते. त्यावेळी, वळसे पाटील यांनी सध्याच्या निवडणूक निकालावर शरद पवार यांच्याशी थोडक्यात चर्चा केली.

मुंबईतील वाय.बी. चव्हाण प्रतिष्टानचा विश्वस्त या नात्याने वळसे पाटील यांनी आज शरद पवारांसोबत बैठकीला हजेरी लावली होती. यंदाची निवडणूक ही वेगळ्या प्रकारची निवडणूक झाल्याचे शरद पवार यांनी म्हटले, असे दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हाचा मला लाभ झाल्याची प्रांजळ कबुलीच दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर दिली.

दिलीप वळसे-पाटील म्हणाले, ‘मुंबईतील वाय.बी. चव्हाण प्रतिष्टानचा विश्वस्त या नात्याने मी बैठकीला हजर होतो, या बैठकीत शरद पवारांचे मी आशिर्वाद घेतले. मी विसरलो की ते काय बोलले, पण आमच्यात राजकिय चर्चा झाली नाही. केवळ यंदाची निवडणूक वेगळी असल्याचे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत तुमच्या मतदारसंघात ट्रम्पेट चिन्हावरील डमी उमेदवारामुळे तुमचा विजय झाला का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता, होय लाभ झाल्याचं सांगत त्यांनी प्रांजळ कबुली दिली. हे खरे आहे की मला ट्रम्पेटचा लाभ झाला, माझ्या इथे ट्रम्पेटने मते घेतली. पण, इतर भागात तसा परिणाम झाला का? ते मला माहिती नाही.’

पवार आणि पवार एकत्र येतील का, या प्रश्नावरही वळसे पाटलांनी सूचक वक्तव्य केले आहे. आता याला अजून वेळ आहे, कारण आधी मुख्यमंत्री ठरेल, मंत्रीमंडळ ठरेल, मग अधिवेशन होईल आणि त्यानंतर होईल कोणता पक्ष कुठे येतोय वगैरे असे म्हणत पवार-पवार एकत्र येण्याच्या प्रश्नावर त्यांनी सूचक विधान केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याच्या प्रश्नाबाबत मला माहिती नाही, कोण कुणाच्या संपर्कात आहेत, कोण नाही याची मला माहिती नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. तर, मुख्यमंत्री पदाबाबत आमच्या पक्षाचे आणि इतर पक्षाचे नेते निर्णय घेतील, असेही वळसे-पाटील म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांनी मतदारसंघात निवडणूक घेऊन गद्दारांना पाडा पाडा पाडा… असे म्हटल्याने मतदारसंघात शरद पवार यांच्या भाषणाची जोरदार चर्चा रंगली होती. त्यातच, निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार देवदत्त निकम यांच्याविरोधात एक डमी उमेदवार उभा करण्यात आला होता. त्या अपक्ष उमेदवाराचे नावही देवदत्त शिवाजी निकम असे होतं आणि त्यांचे चिन्ह देखील तुतारीशी मिळते जुळते होते. ज्या ट्रम्पेट चिन्हामुळेच लोकसभेला शरद पवार यांच्या अनेक उमेदवारांची मतं कमी झाली. साताऱ्यातील उमेदवाराचा पराभव झाला, त्या आंबेगावातही विधानसभेला तेच घडल्याचे दिसून आले. डमी उमेदवार असलेल्या देवदत्त निकम यांच्या ट्रम्पेट चिन्हाला तब्बल 2,950 मतं मिळाली. त्यामुळेच, दिलीप वळसे पाटील यांना 1100 मतांनी निसटता विजय मिळाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे वळसे पाटील यांनी ते मान्यही केले आहे.

Live Video: दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ रांजणगावमध्ये महिला निर्धार मेळावा; पाहा कोण काय म्हणाले…

आंबेगाव-शिरूर मतदार संघातून दिलीप वळसे-पाटील विजयी

आंबेगाव-शिरूर विधानसभा निवडणूकीचा Live निकाल…

शिरूर-हवेली विधानसभा निवडणूकीचा Live निकाल…

…तर मी उमेदवारी मागे घेईनः दिलीप वळसे पाटील

शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावात किती मतदान झाले; पाहा सविस्तर आकडेवारी…

Video: दिलीप वळसे पाटील यांची साथ सोडण्याचे शेखर पाचुंदकर यांनी सांगितले मुख्य कारण…

कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झाल, जाणून घ्या…

राज्यात कोणाची सत्ता येणार, सर्व एक्झिट पोल्सचे निकाल जाणून घ्या…

विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदात्यांचा वाढता टक्का

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

9 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

9 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

9 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

9 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

11 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

11 तास ago