मुख्य बातम्या

शरद पवारांनी जनतेचा कौल समजुन घेत पराभव मान्य करावा; देवेंद्र फडणवीस

शिरुर (तेजस फडके) शरद पवार हे राजकारणाचा ५० वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले जेष्ठ नेते आहेत. त्यामुळे अशा नेत्यांनी संयमाने वागायच असत व पराभव स्वीकारायचा असतो. शरद पवारांनी जनतेचा कौल मान्य करावा. लोकांचं ऐकावं, कार्यकर्ते व खोटं सांगणाऱ्या नेत्यांचं ऐकू नये असा सल्ला राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना दिला.

शिरुर तालुक्याच्या बेट भागातील टाकळी हाजी येथे आज रविवार (दि ८) रोजी सुद्रिक यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त आशिर्वाद देण्यासाठी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, बबनराव सुद्रिक आणि त्यांच्या कुटुंबाचे व माझे चांगले संबंध आहेत. एका वाईट घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्वजण राहिलो. त्यामुळे जवळीकता झाली आहे. त्यांच्या घरातील विवाहसोहळ्यानिमित्त त्यांच आमंत्रण आल्यानंतर मी त्यांना विवाहाला नक्की येईल असे सांगितले होते. त्यामुळे मी आशीर्वाद देण्यासाठी आलो होतो. यावेळी आमदार प्रविण दरेकर तसेच माजी आमदार राम शिंदे हे सुद्धा उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, पराभव का झाला हे पवार साहेबांना महिती आहे. परंतु कार्यकर्त्यांच्या दबावावाखाली शरद पवार वागत असतील तर अशान सर्वसामान्य लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडेल. लोकशाही प्रक्रियेवरील लोकांचा विश्वास उठेल अशी कार्यवाही किमान शरद पवार यांनी करु नये.

 

यावेळी पत्रकारांनी अबू आझमी व सपा भाजपाची ‘बी टीम’ आहे असा आरोप माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला होता असा प्रश्न विचारला. परंतु यावर बोलण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी टाळले.

शिरूर! फायनान्स कंपनीच्या आरेरावीला कंटाळून उचलले आत्महत्येचे पाऊल

शिरूर! बिडी पिताना लुंगीवर पडल्याने अन् होरपळून मृत्यू

शिरूर शहरात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

14 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

14 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

14 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

18 तास ago