मुख्य बातम्या

शिरुर; सामाजिक कार्यकर्त्यांची सुरक्षा ऐरणीवर अशोक भोरडे यांच्या जिवितास धोका पोहचवण्याचा कट…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांच्या चारचाकी गाडील अज्ञात कार चालकाने त्यांच्या समोरुन भरधाव वेगाने कार आडवी मारत घातपात घडवण्याचा प्रयत्न केला. हि घटना बुधवार (दि 29) रात्री पाऊणे दहाच्या सुमारास तळेगाव-न्हावरे रोडवरील तोडकर वस्तीजवळ घडली आहे. याप्रकरणी भोरडे यांच्या तक्रारीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकारामुळे सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तसेच त्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या माफियांच्या विरोधात केलेल्या तक्रारींमुळे गौण माफियांना कोट्यावधी रुपयेचा दंड आकारण्यात आला. महसूल, पोलिस आदी विभागातील अधिकाऱ्यांच्या तक्रारी देखील भोरडे यांनी केलेल्या आहेत. त्यांच्या तक्रारीमुळे अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या होऊन चौकशा सुरु आहे.

 

भोरडे हे सातत्याने गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम करतात. त्याबरोबर निर्भीडपणे असामाजिक तत्त्वांविरुद्ध आवाज उठवतात. त्यामुळे अनेकांना दंड झाल्याने व लोक सेवकांच्या चौकशा सुरु आहेत. त्यामुळे गौण खनिज माफीया व काही लोक सेवक यांकडून भोरडे जीवितास धोका होण्याची शक्यात नाकारता येत नाही. त्यामुळे कोनाच्या तरी सांगण्यावरुन घातपात घडवून यावा या हेतूने हा प्रकार केलेला असावा अशी शाशंकता भोरडे यांनी व्यक्त केली आहे.

 

निमगाव म्हाळुंगी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते अशोक भोरडे हे बुधवारी (दि.२९ मे) रात्री पाऊणे दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या चारचाकी गाडीने तळेगाव ढमढेरे वरुन घरी जात होते. दरम्यान तळेगाव-न्हावरे रोडवरील तोडकर वस्ती येथे कॅनॉल पाटाचे जवळ न्हावरे बाजुच्या दिशेने एक पांढऱ्या रंगाची कार भरधाव वेगात येत कार चालकाने भोरडे यांच्या कारला आडवी मारल्याने प्रसंगावधान राखत भोरडे यांनी त्यांची कार रस्त्याच्या डाव्या बाजुला घेत बचाव केला. त्यानंतर भोरडे यांनी कार वळवून तळेगाव बाजार मैदान पर्यंत गेले. परंतु त्याठिकाणी तीन रस्ते असल्याने सदरची कार ही वेगाने कोणत्यातरी एका रस्त्याने निघून गेली.

 

त्यानंतर शेतीचे कामकाज असल्याने भोरडे तळेगाव रोडने त्यांच्या घरी गेले. काम आटोपल्यानंतर भोरडे यांनी जीवाला धोका असल्याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल केली. भोरडे यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार किशोर तेलंग हे करत आहेत.

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न, पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीच्या हातात चारचाकी; धडक बसल्याने एकाचा मृत्यू

शिरुर; वाळूमाफिया आणि माती चोरांसाठी हवेलीतील बड्या नेत्याचा महसूल व पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव…?

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago