मुख्य बातम्या

शिरुर; व्याजाच्या पैशांसाठी सतत तगादा, एकाची आत्महत्या; प्रेसनोट मध्ये पोलिसांनी आरोपीची नावे वगळली

शिरुर (तेजस फडके) गेल्या वर्षभरात शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली असुन कायदा अन सुव्यवस्था पुर्णपणे ढासळली असुन शिरुर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यातच अनेक गुन्ह्यात शिरुर पोलिस नेमका काय तपास करतात. फिर्यादीला न्याय देण्याऐवजी पोलिस आरोपीना तर पाठीशी घालत नाहीत ना…? अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. 

शिरुर मध्ये व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड करुनही पुन्हा पैशांची मागणी करणे, लाखो रुपयांच्या वसुलीसाठी सतत तगादा लावणे आणि अनोळखी व्यक्तींना घरी पाठवून मानसिक त्रास दिल्याच्या कारणामुळे एका व्यक्तीने आत्महत्या केल्याने शिरुर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु पत्रकारांना सदर गुन्ह्याची माहिती देताना पोलिसांनी पाचही आरोपीची नावे प्रेसनोट मध्ये नमुद केली नाहीत. यावर शिरुरचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांना विचारले असता नावे जाहीर केल्यावर आरोपी फरार होतील तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारुन आरोपीची नावे देतो असे उत्तर दिले. 

सतत पैशाचा तगादा लावल्यामुळे सावकारांच्या त्रासाला कंटाळून संजय बलदोटा या व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना गुरुवार (दि २६) रोजी घडली.याबाबत ऋषभ संजय बलदोटा (वय २८, रा. सैनिक सोसायटी, शिरुर) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, संजय बलदोटा व त्यांच्या मुलाने काही व्यक्तींकडून व्याजाने पैसे घेतले होते. या पैशांची व्याजासह पुर्ण परतफेड करुनही संबंधितांकडून पुन्हा २३ लाख रुपयांची मागणी केली जात होती. 

तसेच वसुलीसाठी अनोळखी व्यक्तींना घरी पाठवून वारंवार मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. याशिवाय अन्य व्यक्तीकडून घेतलेल्या पैशांच्या व्याजापोटी १२ लाख रुपयांसाठी तगादा लावण्यात येत होता. इतर काही व्यक्तींकडूनही त्रास दिला जात असल्याने या सर्वांच्या जाचाला कंटाळून संजय बलदोटा यांनी गुरुवारी सकाळी सुमारे ८:१५ वाजता शिरुर येथील पाण्याच्या टाकीजवळ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करत आहेत. 

सुसाईड नोटची चर्चा… 

संजय बलदोटा यांनी आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईट नोट लिहिली असुन त्यामध्ये शिरुर मधील बड्या सावकारांचा उल्लेख केल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा आहे. परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर शिरुर पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना पाच आरोपीची नावे लपविली आहेत. त्यामुळे शिरुर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे शिरुर शहरात कथित सुसाईड नोट मध्ये कोणाकोणाची नावे आहेत याची जोरदार चर्चा सुरु असताना पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना आरोपीची नावे का वगळली असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे. 

(क्रमश:) 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

2०२७ पर्यंत इंदू मिल स्मारक पूर्ण करा! मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाईचा इशारा मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील इंदू मिल…

11 तास ago

क्रीडा संकुलांचा अखर्चित निधी परत घेणार! गरजेनुसार इतर संकुलांना पुनर्वितरण; सुनेत्रा पवारांचे कडक निर्देश

मुंबई : राज्यातील क्रीडा संकुलांसाठी मंजूर करण्यात आलेला मात्र दीर्घकाळ खर्चाविना पडून असलेला निधी आता…

11 तास ago

रायगडावरील गडकोटांचे पावित्र्य जपा; संवर्धनासाठी लोकचळवळ उभी करा; एकनाथ शिंदे

‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ अभियानातून शिवरायांच्या दूरदृष्टीचा जागर; प्लास्टिक कचरा, अतिक्रमण आणि प्रदूषण रोखण्याचे आवाहन…

11 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा ठाण्यात एल्गार; भाजप सरकारवर सपकाळांचा घणाघात!

“संविधान धोक्यात, लोकशाही वाचवणे ही काळाची गरज”; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याचीही मागणी ठाणे: भारतीय…

11 तास ago

शिरूर! गोरेपणाच्या जाहिराती करून आरोग्याशी खेळ! विषारी क्रीमने मलठणच्या तरुणाला ढकलले मृत्यूच्या दारात…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : चेहरा गोरा करण्याच्या जाहिरातींना भुलून सौंदर्यप्रसाधनांचा वापर करणाऱ्या तरुणांसाठी डोळे उघडणारी…

14 तास ago

शिरूरमध्ये ‘पोलीस’ असल्याचा बनाव रचला, भामट्यांनी सोनं आणि रोख रकमेवर मारला डल्ला…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : 'पुढे पोलीस कारवाई व दंड करत आहेत, आम्हीही पोलीसच आहोत, तुमचे…

14 तास ago