मुख्य बातम्या

शिरुर न्यायालयाने डॉक्टर आरोपीस ठोठावली दोन वर्षे शिक्षा व ३० हजार रुपये दंड

शिरुर (तेजस फडके): न्हावरे (ता.शिरुर) गावच्या हददीत नाथकृपा हॉस्पिटल मध्ये दिनांक ९ ऑगस्ट २०२० रोजी रात्री १०:०० वाजण्याच्या सुमारास आरोपी डॉ रामहरी भुजंगराव लाड (रा.न्हावरे, ता.शिरुर,जि. पुणे) यांच्या हॉस्पिटलमध्ये एक महिला उपचार घेत असताना आरोपी डॉ. रामहरी भुजंगराव लाड याने फिर्यादी महिलेस हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये बोलावुन घेवुन फिर्यादीचे अंगाशी लगड करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन फिर्यादी सोबत अश्लिल बोलुन फिर्यादीस लज्जा वाटेल असे वर्तन केले होते.

या प्रकाराबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस एन मोटे यांनी पुर्ण करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सदर गुन्हयाचा खटला शिरुर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे ए झारी यांच्या न्यायालयात सुरु होता. यात सरकारच्या वतीने सहायक सरकारी अभियोक्ता माया शिवाजी क्षीरसागर (जाधव) यांनी युक्तीवाद केला असुन वरील प्रकरणामध्ये सबळ साक्षी पुराव्याअंती शिरुर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. ए. झारी यांनी आरोपीस दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ रोजी भारतीय दंड विधान सहिता कलम ३५४ मध्ये दोन वर्ष व भारतीय दंड विधान संहिता कायदा कलम ३५४ (अ) मध्ये दोन वर्ष कारावास दोन्ही शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. तसेच ३० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता माया शिवाजी क्षीरसागर (जाधव), पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी म्हणुन पोलीस हवालदार तुकाराम गोरे, महीला पोलीस अंमलदार मनिषा फंड, तसेच वॉरंट व समसबाबत पोलीस हवालदार बाळकृष्ण वाडेकर व पोलीस अंमलदार प्रकाश वाघमारे यांनी कामकाज पाहीलेले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…

26 मिनिटे ago

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…

32 मिनिटे ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

2 तास ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

19 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

23 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

23 तास ago