शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील मांडवगण फराटा येथे एका महिलेचा पाठलाग करुन छेडछाड तसेच घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपीची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे.
सदरच्या गुन्हातील आरोपीला शिरुर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी निर्दोष मुक्तता केलेली आहे. संदीप सुभाष अडसूळ (वय ४४) रा.मांडवगण फराटा ता.शिरुर, जि.पुणे अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी एका ३० वर्षीय महिलेने शिरुर पोलीस स्टेशन येथे २७ ऑक्टोबर २०१८ रोजी फिर्याद दाखल केली होती.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी व पीडित हे एकाच परिसरात राहत आहेत. संदीप सुभाष आडसूळ यांनी फिर्यादी यांचा अनेक वेळा पाठलाग करुन त्यांची छेड काढलेली होती. तसेच आरोपी यांनी फिर्यादी यांच्या घरामध्ये घुसून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती असा त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला होता.
सदरचा खटला हा शिरुर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये सुरु असताना आरोपी संदीप सुभाष अडसूळ यांच्या वतीने अँड सुमित देविदास पोटे यांनी कामकाज पाहिले या खटल्यात सरकारी पक्षाच्या साक्षीदारांचा उलट तपास अँड सुमित पोटे यांनी घेतला असता तपासा अंती आरोपीच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध होईल असा कोणताही सबळ पुरावा अभिलेखावर आला नसल्याबाबतचा युक्तिवाद अँड सुमित पोटे यांनी केला. सरकार पक्षाचा व बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी ठरवलेल्या संदीप सुभाष अडसूळ याची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…