मुख्य बातम्या

शिरुर; शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जनावरे चोरी करणाऱ्याला पोलिसांनी मुद्देमालासह केली अटक

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन (Ranjangaon MIDC Police) हद्दीत शेतकऱ्यांचे पशुधन चोरणाऱ्या दोघांपैकी एकाला पोलिसांनी मुद्दे मालासह अटक केली. तर पोलिसांची चाहूल लागताच एकजण फरार झाला आहे.

 

रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही दिवसांपुर्वी शेतकऱ्यांच्या गोठ्यामधुन जनावरे चोरीच्या घटना घडल्याने शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी गाई, म्हैस पालन करुन दुग्ध व्यवसाय करतात. त्यामुळे दुध देणारी जनावरे चोरीचा प्रकार हा शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर दुष्परीणाम करणारी घटना असल्याने सदर घटनेचे गांभीर्य ओळखत रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी आरोपीचा तपास पथकाच्या मदतीने शोध घेण्याचे काम सुरु केले होते.

 

दि २२ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री रांजणगावच्या हद्दीतील लांडेवस्ती, सोनेसांगवी रोडलगत राहणारे शेतकरी रमेश तबन खेडकर (वय ७२) यांच्या गोठ्यातील पंढरपुरी जातीच्या दोन म्हैस चोरीस गेल्या होत्या. सदर प्रकरणी अज्ञात आरोपीविरुध्द दि. २९ डिसेंबर २०२३ रोजी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

सदर गुन्हयातील आरोपीचा व चोरीस गेलेल्या म्हशींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तपास पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, योगेश गुंड यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हा घडलेल्या परीसरातील व रांजणगाव, कोंढापुरी, कासारी फाटा, तळेगाव ढमढेरे, आष्टापुर, मलठण, कवठे येमाई, शिंगवे पारगाव, नारायणगाव, ओझर, बनकरफाटा, सरळगाव, मुरबाड इ. भागातील रोडवरील एकुण १५० ते २०० सीसीटिव्हि (CCTV) कॅमेऱ्यातील व्हिडीओ फुटेज तपासुन आरोपी हे सदर गुन्हयातील म्हशी या त्यांच्याकडील पिकअप गाडीमधुन (कळंबाड, ता. मुरबाड, जि.ठाणे) येथे गेले असल्याचे निदर्शनास आले.

 

या परिसरामध्ये तपास पथकातील दत्तात्रय शिंदे, उमेश कुतवळ व तपासी अंमलदार पोलिस हवालदार विजय सरजिने यांनी जावुन शोध घेतला असता त्यांना त्या ठिकाणावरील एका गोठ्यामध्ये चोरीस गेलेल्या म्हशी दिसुन आल्या असता सदरच्या म्हशी फिर्यादी यांनी पाहिल्यानंतर ओळखल्या. त्यानंतर तपास पथकासह सदर ठिकाणी अचानक छापा टाकला असता आरोपी १)पद्ममाकर उर्फ नागेश शांताराम मोरे (वय २३) रा. कळंबाड, जिल्हा परीषद शाळेजवळ, ता. मुरबाड, जि.ठाणे याला ताब्यात घेण्यात आले असुन दुसरा आरोपी पोलीसांची चाहुल लागल्याने पळुन गेला आहे. पळुन गेलेल्या आरोपीचे नाव २) नरेश भाऊ मोरे रा. कळंबाड, जिल्हा परीषद शाळेजवळ, ता. मुरबाड, जि.ठाणे असे असल्याने निष्पन्न झाले आहे.

 

रांजणगाव पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीकडुन चोरीस गेलेल्या २ तसेच इतर ठिकाणावरुन चोरलेल्या ३ अशा एकुण ५ म्हशी व गुन्हयात वापरलेला महिंद्रा कंपनीचा पिकअप गाडी क्र. एम एच ०५ डि के २७६१ असा एकुण ७ लाख ४० हजार किंमतीच्या ५ म्हशी व पिकअप गाडी जप्त करण्यात आलेली आहे. ताब्यात घेण्यात आलेला आरोपी पद्मामाकर शांताराम मोरे याला दि ६ जानेवारी २०२५ रोजी रात्री १०:४० वाजता अटक करण्यात आलेली असुन त्याला शिरुर न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने आरोपीला दि ९ जानेवारी २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे.

 

या गुन्ह्यातील फरार आरोपी नरेश मोरे हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्याविरुध्द घरफोडी, चोरी, जनावरे चोरी सारखे ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील टोकावडे व मुरबाड पोलीस ठाण्यात एकुण ८ गुन्हे दाखल आहेत. या गुन्हयातील अटक आरोपीकडुन रांजणगाव, शिरुर व पारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एकुण ४ जनावर चोरीचे गुन्हे उघडकीस आले असुन या आरोपीनी पोलीस स्टेशन हद्दीत तसेच इतर भागात अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता असल्याने त्याबाबत अधिक सखोल तपास सुरु आहे. सदर गुन्ह्यातील म्हैस मालक व परिसरातील शेतकरी यांनी गुन्हे उघडकिस आल्याने समाधान व्यक्त केले आहे.

 

सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, पुण्याचे अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगावचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, योगेश गुंड, पोलिस हवालदार विजय सरजिने, विलास आंबेकर यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा पुढील अधिक तपास विजय सरजिने हे करत आहेत.

शिरूर! बिबटयाच्या हल्ल्यात दहा बकऱ्या आणि घोडा ठार

शिरूरमध्ये वृद्ध महिलेच्या गळ्याला तलवार लावून लुटणाऱ्याला शिरूर पोलिसांनी केले जेरबंद

रांजणगाव पोलिसांनी कारेगावातील ‘कोयता गँग’ च्या २४ तासाच्या आत आवळल्या मुसक्या

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

6 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

14 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

23 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

23 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

24 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

24 तास ago