shirur-police

शिरूरमध्ये वृद्ध महिलेच्या गळ्याला तलवार लावून लुटणाऱ्याला शिरूर पोलिसांनी केले जेरबंद…

क्राईम मुख्य बातम्या

शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरूर शहरातील स्टेट बँक कॉलनी येथे ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्याला तलवार लावून गळ्यातील पोत हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला शिरूर पोलिस स्टेशनच्या पथकाने जेरबंद केले आहे, अशी माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली.

आरोपीने हा गुन्हा दोन अल्पवयीन मुलांच्या साथीने केल्याची कबुली दिली आहे. शिरूर पोलिसांच्या या कारवाईचे शिरूर शहर व तालुक्यातून कौतुक होत आहे. नागेश अशोक अल्ले (रा. गोलेगाव रोड, वात्सल्य हॉस्पिटल शेजारी, ता शिरूर, जि पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत रेखा शिवाजी वाखारे यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली होती.

१ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता फिर्यादी यांच्या सासूबाई हिराबाई वाखारे या घरातील हॉलमध्ये बसलेल्या असताना अचानक घरामध्ये तीन तरुणांनी प्रवेश केला. वृद्ध हिराबाई यांच्या गळ्याला तलवार लावून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून येण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिरूर पोलिस स्टेशन जवळच असणाऱ्या स्टेट बँक कॉलनी येथे अशाप्रकारे वृद्ध महिले बाबत घरात घुसून जबरी चोरी झाल्याने याबाबत नागरिकांमध्ये व महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व स्थानिक शोध पथकाला गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते.

पोलिस पथकाने सदर भागामध्ये असणारे सीसीटीव्ही कॅमेरे व तांत्रिक माहितीच्या आधारे यांची पाहणी करून आरोपी शोधण्याचे काम तपास पथकाने सुरू केले असता तपास पथकाला या गुन्ह्यातील आरोपी गोलेगाव रस्त्यावर येणार असल्याचे समजले. पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस हवालदार नाथा जगताप,पोलिस अमंलदार नितेश थोरात, सचिन भोई, विजय शिंदे, निरज पिसाळ, निखील रावडे, रघुनाथ हळनोर, अजय पाटील या तपास पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी नागेश अल्ले याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, हा गुन्हा त्याने दोन अल्पवयीन मुलांच्या साथीने केला असल्याचे सांगितले आहे. पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहे.

सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, पुणे अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोसई शुभम चव्हाण, पो हवा नाथसाहेब जगताप, पोलिस अमंलदार नितेश थोरात, सचिन भोई, विजय शिंदे, निरज पिसाळ, निखील रावडे, रघुनाथ हळनोर, अजय पाटील यांचे पोलिस पथकाने केली आहे.

शिरूर! अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघातात दोन ठार तर एक जखमी…

शिरूर तालुक्यात चिडलेल्या पत्नीने घातली पतीच्या डोक्यात पहार…

शिरूर! महाविद्यालयीन युवतीचा साखरपुडा झालेला असताना रस्त्यात अडवले अन्…

शिरूर तालुक्यातील शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल…

शिरूरमध्ये खोटं लग्न करणारी लुटेरी दुल्हनसह टोळी जेरबंद…