मुख्य बातम्या

Video; शिरूर! जमिन मोजणीच्या वेळी बेकायदेशीर जमाव जमवून अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न…

गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाची टाळाटाळ

शिरुर (तेजस फडके): सविंदणे (ता. शिरूर) येथे शेतजमिनीची सरकारी मोजणी करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मोजणी करण्यास मज्जाव करण्यासाठी बेकायदेशीर जमाव जमवून अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (ता. २९) घडली. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही अरेरावी करण्यात आली.

सविंदणे (ता. शिरूर) येथील शेतकरी मंदा तानाजी रोकडे यांनी त्यांच्या मालकीच्या जमिनीची हद्दकायम मोजणी करण्यासाठी भुमि अभिलेख कार्यालय शिरूर येथे अर्ज केला होता. त्यानुसार २० सप्टेंबर रोजी मोजणी मंजूर करण्यात आली होती. त्यावेळी काही व्यक्ती बेकायदेशीरपणे हरकत घेऊन वादविवाद करणार असल्याची शक्यता असल्याने अर्जदार यांनी सशुल्क पोलीस बंदोबस्त घेतला होता. परंतु, त्यावेळी भिवा खुमाजी पडवळ, भक्तिराम शिवराम पडवळ, रतन दत्तात्रेय पडवळ यांसह त्यांच्या कुटुंबातील लोकांनी वादविवाद करत मोजणी कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे मोजणी होऊ शकली नाही.

तदनंतर पडवळ यांनी मंदा रोकडे यांच्या मालकीच्या जमीनीची मोजणी करण्यासाठी स्थगिती द्यावी म्हणून उप अधिक्षक भुमि अभिलेख व घोडनदी न्यायालयात अर्ज केला. परंतु न्यायालयाने स्थगिती देण्यासाठीचा अर्ज नामंजूर केला. त्यानंतर शुक्रवारी (ता. २९) रोजी मोजणी कर्मचारी पियुष बगाडे, पोलीस कर्मचारी व अर्जदार शेतात मोजणी करण्यासाठी गेले असता. तेथे भिवा खुमाजी पडवळ, भक्तिराम शिवराम पडवळ, रतन दत्तात्रेय पडवळ यांसह त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी सरकारी मोजणी करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मोजणी करण्यापासून मज्जाव केला. बेकायदेशीर जमाव जमवून अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही अरेरावी करण्यात आली. तरीही भुमि अभिलेख अधिकारी व पोलिस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येत असून बघ्याची भुमिका घेतली जात आहे.

दरम्यान, अर्जदार मंदा तानाजी रोकडे यांनी न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भुमि अभिलेख व पोलीस प्रशासन कायदेशीर मार्गाने न्याय मागणा-या शेतकरी महिलेला न्याय देणार का? की, बघ्याची भुमिका घेत बेकायदेशीर कृत्य करणा-यांना मोकळीक देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मोजणी अधिकारी व पोलिसांच्या बघ्याच्या भुमिकेमुळे शेतकरी त्रस्त…
शिरूर तालुक्यातील गावांमध्ये सरकारी मोजणी करणे शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत आहे. मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर अनेकदा वर्षभर तारखा मिळत नाही. चिरीमिरी साठी अनेक प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात येतात. त्यातही तारीख मिळाल्यास पोलीस बंदोबस्तात ही मोजणी होत नाहीत. सरकारी कामात अडथळा निर्माण करत अरेरावी करणा-यांवर कठोर कारवाई करण्यात येत नसल्याने घटना वाढत आहेत. भुमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी व पोलीस अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत बघ्याची भुमिका घेत आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

शिरूर! भ्रष्टाचारी तलाठ्यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते सुभाष जगताप करणार उपोषण…

बापरे! शिरूर शहरात तब्बल ८४ लाख ३४ हजार रुपयांचा एकाला ऑनलाईन गंडा…

शिरुर तालुक्यात मारहाण करुन जबरी दरोडा; सोन्याच्या झुब्यासाठी महिलेचे कान कापले

पुणे-नगर महामार्गावर युवती किंवा महिलांना लिफ्ट देताय…? सावधान…

शिरूर तालुक्यातील तलाठी, मंडल आधिकाऱ्यांकडून आर्थिक मलईसाठी नोंदी करण्यासाठी होतेय टाळाटाळ…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

4 तास ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

17 तास ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

2 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

2 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

2 दिवस ago