आरोग्य

मूग भिजवून खाण्याचे फायदे

आजकाल लोक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि फीट राहण्यासाठी पौष्टिक आहारावर अधिक भर देतात. हिवाळ्यात तर अनेक पौष्टिक पदार्थांचं सेवन केलं जातं. वेगवेगळे कडधान्य भिजवून खातात. यातीलच एक म्हणजे मूग. मूग डाळीचं तर लोक वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करतातच. मात्र, अनेकांना भिजवलेले मूग खाण्याचे फायदे माहीत नसतात. तेच आज आम्ही सांगणार आहोत. खासकरून हिवाळ्यात भिजवलेल्या मुगाचं सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

मुगाची खासियत

मुगात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असतात. ज्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते, वजन कमी होण्यास मदत मिळते, तसेच हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. महत्वाची बाब म्हणजे मूगाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे शरीरात शुगर लेव्हल हळूहळू वाढते.

मूग भिजवून खाण्याचे फायदे

१) पचनक्रिया सुधारते

मूग भिजवून ठेवल्याने ते मुलायम होतात आणि यातील विषारी तत्व निघून जातात. मुगाच्या नियमित सेवनाने पचनक्रिया आणखी मजबूत होते आणि पोटासंबंधी समस्या जसे की, बद्धकोष्ठताही दूर होते. तसेच मूग भिजवून खाल्ले तर पचनही लवकर होतात आणि त्यातील पोषक तत्वांचं अवशोषणही चांगलं होतं

२) वजन कमी होतं

हिरवे मूग भिजवून खाल्ल्याने वजन कमी करण्यासही मदत मिळते. कारण यात कॅलरी खूप कमी असतात. यात फायबर भरपूर असल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि शरीरातील विषारी तत्वही बाहेर पडण्यास मदत मिळते. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर मूगाचा तुमच्या आहारात समावेश करा.

३) हृदयासाठी फायदेशीर

मुगात पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि फॉलिक अ‍ॅसिडसारखे महत्वाचे तत्व असतात, जे हृदयासाठी फायदेशीर असतात. याने ब्लड प्रेशर कंट्रोल होतं, हृदयाची धडधड नियमित होते आणि रक्तात वाढलेली कोलेस्ट्रॉल लेव्हलही कमी होते. मूगाच्या नियमित सेवनाने हृदयासंबंधी समस्यांचा धोका कमी राहतो.

४) किडनीसाठी फायदेशीर

मुगाचं किंवा मूग डाळीचं नियमित सेवन केल्यास किडनीची कार्यक्षमता चांगली होते. याने शरीरात वाढलेलं यूरिक अ‍ॅसिड आणि विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत मिळते. त्यासोबतच किडनीचा इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.

५) इम्यून सिस्टीम मजूबत होत

मुगात आयर्न, झिंक आणि सेलेनियमसारखे खनिज असतात, जे शरीराची इम्यूनिटी वाढवतात. याने शरीराची रोगांसोबत लढण्याची क्षमता वाढते. तसेच यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सही असतात जे शरीराचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात.

कसं करावं सेवन

मूग भिजवण्याआधी चांगले धुवून घ्या. नंतर ते पाण्यात ६ ते ८ तासांसाठी भिजवून ठेवा. सकाळी याचं सेवन सलाद म्हणून करू शकता. याची टेस्ट वाढवण्यासाठी यात लिंबाचा रस, काळे मिरे टाकू शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

12 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

15 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

15 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

16 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

16 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

16 तास ago