Anjali Gaikwad
शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील रामलिंग येथील एका महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट ‘शिरुर तालुका डॉट कॉम’च्या हाती लागली आहे.
शिरुर रामलिंग येथे राहणाऱ्या अंजली ज्ञानदेव गायकवाड (वय ३३) या महिलेने सोमवारी (ता. 8) दुपारी चारच्या दरम्यान राहत्या घरात सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी सदर महिलेने सहा पानांची सुसाईड नोट लिहिली होती. ती सुसाईड नोट ‘www.shirurtaluka.com’ च्या हाती लागली आहे.
संबंधित सुसाईड नोट मध्ये सदर महिलेने अनेक गोष्टीचा उलगडा केला आहे. या सुसाईड नोट मुळे पोलिसांना तपास करण्यात मदत होणार आहे. तसेच सदर महिलेने आत्महत्या का केली…? कोणामुळे केली…? याचाही शोध लागण्यास मदत होईल. सुसाईड नोट मध्ये शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC मध्ये बांधकाम व्यवसाय करणाऱ्या एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावाचाही उल्लेख असल्याचे शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत आता सदर व्यक्तीवर काय कारवाई करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, अंजली ज्ञानदेव गायकवाड यांनी आत्महत्या केल्यानंतर शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत तक्रार दाखल झाली असून, पोलिसांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शिरुरमध्ये गळफास घेऊन महिलेची आत्महत्या, आत्महत्येपुर्वी लिहिली सुसाईड नोट
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…