Anjali Gaikwad

शिरुरमध्ये गळफास घेऊन महिलेची आत्महत्या, आत्महत्येपुर्वी लिहिली सुसाईड नोट 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर रामलिंग येथे राहणाऱ्या एका  33 वर्षीय महिलेने सोमवार (दि 8) रोजी दुपारी चारच्या दरम्यान राहत्या घरात सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने फाशी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अंजली ज्ञानदेव गायकवाड (वय 33, रा.रामलिंग ता.शिरुर जि पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत ज्ञानदेव आप्पासाहेब गायकवाड (रा. श्रीगोंदा, ता.श्रीगोंदा जि.अ.नगर) यांनी  शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानदेव गायकवाड यांना (दि 8) रोजी दुपारी 4 च्या च्या दरम्यान त्यांची मुलगी शलाका सुपेकर (रा. श्रीगोंदा) हिने फोन करुन अंजली हिने राहत्या घरात सिलींग फॅनला साडीच्या साह्याने फाशी घेतल्याचे सांगितले. त्यानंतर ते त्यांची पत्नी, मुलगी शलाका सुपेकर यांच्यासह शिरुर येथील खासगी रुग्णालयात गेले होते. त्यावेळी डॉक्टरांनी अंजली गायकवाड हिचा उपचारापुर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी शिरुर पोलिस स्टेशनला धाव घेत फिर्याद दाखल केली.

आत्महत्येपुर्वी महिलेने लिहिलेली सुसाईड नोट गायब…?

अंजली गायकवाड यांनी आत्महत्या करण्याच्या अधी सुसाईड नोट लिहिली होती. परंतु शिरुर पोलिसांना ती सापडली नाही. त्यामुळे या प्रकरणात गुंतागुंत वाढण्याची शक्यता आहे. या सुसाईड नोट मध्ये शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC मध्ये बांधकाम व्यवसाय करणाऱ्या एका प्रतिष्ठित व्यक्तीचे नाव असल्याची परिसरात चर्चा  सुरू आहे. त्यामुळे त्या प्रतिष्ठित व्यक्तीच्याच जवळच्या काही लोकांनी ही सुसाईड नोट गायब तर केली नाही ना? अशी नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.