groom beating
नवी दिल्ली : सोशल मीडियावर लग्नाचे विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही इमोशनल असतात तर काही मजेशीर. पण सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. कारण या व्हिडीओ सासऱ्याने चक्क नवरदेवाची लग्नातच धुलाई केली आहे.
व्हिडीओत पाहायला मिळते की, नवरदेवासमोर एक व्यक्ती हातात चप्पल घेऊन आला आणि चपलेने मारहाण केली. नवरदेव हात जोडून माफी मागतो आहे. ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नवरदेवाला मारणारी व्यक्ती त्याचा सासरा असल्याचे सांगितले जात आहे. नवरदेवाने हुंडा मागितला म्हणून सासऱ्यांनी त्याला मारलं, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
सासऱ्यांनी हुंडा द्यायला नकार दिलाच. पण सोबतच हुंडा मागणाऱ्या जावयाला अद्दलही घडवली. पण, हा व्हिडीओ नेमका कुठला, कधीचा आहे, नवरदेवाला मारणारी व्यक्ती त्याचा सासराच आहे का, ही मारहाण हुंड्यासाठीच झाली का? याबद्दलची अधिकृत माहिती हाती आलेली नाही.
ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…