omkar-walke-karegaon
कारेगाव (तेजस फडके) : “किरकोळ वाद… पण त्यातून उफाळलेला संताप… आणि शेवटी निर्दयी खून!” अशी थरकाप उडवणारी घटना शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे घडली. एका किरकोळ धक्काबुक्कीतून सुरु झालेला वाद एवढा चिघळला की, अखेर निष्पाप युवाकाच जीव गेला आहे.
याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शकील मोहम्मद हाजी तसेच त्याचा भाऊ सिध्दीकी मोहम्मद (रा. कारेगाव, मूळ नांदेड) यांचा ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन ओंकार वाळके व त्याच्या साथीदाराशी किरकोळ वाद झाला. मात्र, हा राग मनात धरुन दोघांनी ४ ऑक्टोबर रोजी पहाटे दोनच्या सुमारास त्यांच्या घरात घुसून निर्दयी हल्ला चढवला. लाकडी दांडके, प्लास्टिक पाईप आणि हाताने झालेल्या मारहाणीत सिध्दीकीचा जागीच मृत्यू झाला तर शकील गंभीर जखमी झाला आहे. गुन्ह्या घडल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले. पण रांजणगाव MIDC पोलिसांनी विजेच्या वेगाने कारवाई करत अवघ्या दोन तासांत आरोपी ओंकार सिताराम वाळके आणि विजय ज्ञानेश्वर जगधने (दोन्ही रा. कोरेगाव) यांना जेरबंद केले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, पुण्याचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगावचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, निळकंठ तिडके, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार ब्रम्हा पोवार, अभिमान कोळेकर, विजय सरजिने, वैजनाथ नागरगोजे, पोलिस कॉन्स्टेबल योगेश गुंड, गणेश वाघ, प्रविण पिठले, किरण आव्हाड यांनी कारवाई केली आहे.
संबंधित गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे हे करत आहेत. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मोहम्मद शकील यांच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पैश्यासाठी खून! शिरूर पोलिसांची केली काही तासात गुन्ह्याची उकल, दोघे आरोपी जेरबंद
शिरूर! अल्पवयीन मुलांचे अपहरण अन् मुलीचा खून करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
खळबळजनक! शिरूर तालुक्यात करंट देऊन पत्नीचा केला खून; कारण…
शिरूर तालुक्यात युवकाचा खून; खुनी दोन तासात पोलिसांच्या ताब्यात…
शिरूर तालुक्यात पेट्रोल टाकून प्रेत जाळणारे गजाआड; प्रेमसंबंधातून खून…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…