शिरूर (अरूणकुमार मोटे): नवऱ्याला सतत हिनवत असल्यामुळे वाद विकोपाला गेल्यानंतर नवऱ्याने बायकोचा रस्सीने गळा आवळून, वायरने करंट देवून निर्घृन खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथे ०३ जुलै रोजी दुपारी २ वाजता राहत्या घरामध्ये अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून शितल स्वप्निल रणपिसे (वय २३) हिचा निळ्या रंगाच्या रस्सीने गळा आवळून व काळ्या रंगाचे वायरने करंट देवून खुन केला होता. या बाबत शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता.
शिरूर पोलिसांनी जलद गतीने तपासाची चक्रे फिरवत शितलचा नवरा स्वप्नील श्यामराव रणपिसे यानेच खुन केल्याचे निष्पन्न केले आहे. स्वप्नील खुन झाला त्यावेळेस घटनास्थळी नव्हता. कामावर होता असे भासवत पोलिसांची दिशाभुल करत होता. अखेर पोलिस खाक्या दाखवताच त्याने खुन केल्याचे कबुल केले आहे. शितल स्वप्नीलला सारखी हिनवत होती. यावरून दोघात सतत वाद होत होते. अखेर या वादाला कंटाळून स्वप्नीलने तिचा गळा आवळून करंट देवून तिचा काटा काढला. या गुन्ह्याचा पुढील तपास ए .पी.आय. अमोल पन्हाळकर हे करत आहेत.
शिरुर तालुक्यात चोऱ्या सुरुच, मलठण गावात बंद दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांकडून चोरी
रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत किरकोळ कारणातून युवकाचा खून…
शिरूर तालुक्यातील दरोड्यादरम्यान महिलेचा खून; आरोपी गजाआड…
शिरुर तालुक्यात दारु पिण्याच्या वादातून झोपेलेल्या पत्नीचा गळा आवळून खून
शिरूर तालुक्यात युवकाचा खून; खुनी दोन तासात पोलिसांच्या ताब्यात…