मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यात ३ लाखांहून अधिक मतदार; ७ फेब्रुवारीला मतदान, ९ फेब्रुवारीला मतमोजणी

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी एकूण ३ लाख १ हजार ९५६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १ लाख ५३ हजार ४२५ पुरुष, १ लाख ४८ हजार ५१८ महिला आणि १३ इतर मतदार यांचा समावेश आहे.

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७ गटांपैकी पाबळ गटात सर्वाधिक ४६ हजार ६२० मतदार असून, पंचायत समितीच्या १४ गणांपैकी केंदुर गणात सर्वाधिक २३ हजार ३३० मतदार असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.या निवडणुकीसाठी शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून कारेगाव येथील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणी केली जाणार आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाचे सावट या निवडणुकीवर दिसून येत असून, संपूर्ण तालुक्यात शोकाकुल वातावरण आहे. त्यामुळे निवडणूक प्रचार व वातावरणावर त्याचा परिणाम जाणवत आहे.

जिल्हा परिषद गटनिहाय मतदारसंख्या

कवठे यमाई – ४२,६९०

न्हावरे – ४३,२४१

रांजणगाव गणपती – ४१,१२१

पाबळ – ४६,६२० (सर्वाधिक)

शिक्रापूर – ४०,७४७

तळेगाव ढमढेरे – ४३,६७७

मांडवगण फराटा – ४३,६९०

पंचायत समिती गणनिहाय मतदारसंख्या

टाकळी हाजी – २०,७२८

कवठे यमाई – २१,९६२

शिरूर ग्रामीण – २२,७६५

न्हावरे – २०,४७६

रांजणगाव गणपती – २०,७३२

कारेगाव – २०,३८९

पाबळ – २३,२९०

केंदुर – २३,३३० (सर्वाधिक)

शिक्रापूर – २१,१५९

सणसवाडी – १९,५८८

तळेगाव ढमढेरे – २३,०८१

रांजणगाव सांडस – २०,५९६

वडगाव रासाई – २२,२५४

मांडवगण फराटा – २१,४३६

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

4 तास ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

4 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

4 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

5 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

5 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…

5 तास ago