महाराष्ट्र

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी बंधनकारक; उद्योग व खासगी आस्थापनांना शासनाचे आदेश

मुंबई: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी शनिवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार व कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले आहे.

निवडणूक होणाऱ्या क्षेत्रातील मतदार असलेले कामगार, अधिकारी व कर्मचारी तसेच कामानिमित्त निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदारांनाही मतदानासाठी पूर्ण दिवसाची भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे आदेश खासगी कंपन्या, कारखाने, दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार व औद्योगिक उपक्रम, आयटी कंपन्या, शॉपिंग मॉल्स व रिटेल आस्थापना यांना लागू राहणार आहेत.

दरम्यान, धोकादायक किंवा अत्यावश्यक सेवांमध्ये पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना मतदानासाठी दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापना मालकांवर राहणार आहे.

या निवडणुकीसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव आणि लातूर या 12 जिल्ह्यांतील संबंधित पंचायत समित्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि प्रत्येक मतदाराला हक्क बजावण्याची संधी मिळावी, यासाठी शासनाने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

5 तास ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

5 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

5 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

5 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

5 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…

6 तास ago