महाराष्ट्र

अजित पवारांना दोनदा मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली! अंतर्गत राजकारण कारणीभूत;  बबनराव पाचपुते यांचा दावा

मुंबई: भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना एकदा नव्हे तर दोनदा मुख्यमंत्रीपदाची स्पष्ट संधी मिळूनही ती राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे हुकल्याचा खळबळजनक दावा केला आहे. अजित पवार यांच्यासोबत काम केलेल्या पाचपुते यांनी यासंदर्भात अनेक आठवणींना उजाळा दिला.

बबनराव पाचपुते हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात मंत्री होते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. ते म्हणाले, “अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची केवळ एक नव्हे, तर दोन वेळा स्पष्ट संधी होती. त्या दोन्ही वेळांचा साक्षीदार मी स्वतः आहे.”

पहिल्या संधीबाबत बोलताना पाचपुते म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असताना पक्षाच्या 62 आमदारांपैकी 57 आमदारांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करावे, अशी लेखी समर्थनपत्रे दिली होती. मात्र, पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांच्या विरोधामुळे ही संधी हुकली.”

दुसऱ्या वेळेस विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 72, तर काँग्रेसचे 69 आमदार निवडून आले होते. त्यामुळे मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे जाणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, या वेळीही पक्षातील अंतर्गत विरोधामुळे अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, असा दावा पाचपुते यांनी केला.

“अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी पक्षात ठाम भूमिका घेतली. त्याची किंमत मला पक्षातून बाहेर पडून मोजावी लागली,” असेही पाचपुते म्हणाले.अजित पवार यांच्या निधनाबाबत भावना व्यक्त करताना पाचपुते म्हणाले, “अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे अपूरणीय नुकसान झाले आहे. जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले गेलेले, पण प्रत्यक्षात न होऊ शकलेले मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख कायम राहील.”

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

21 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

21 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

21 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago