मुख्य बातम्या

शिरुर तालुका म्हणजे महसूल, पोलिस, MIDC तील कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी भ्रष्टाचाराचे कुरण…?

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गेल्या ३० ते ३५ वर्षात मोठया प्रमाणात औद्योगिक वसाहत उभी राहीली. त्यात वढु बुद्रुक, कोरेगाव भिमा, सणसवाडी, शिक्रापुर, कोंढापुरी आणि आशिया खंडातील सर्वात मोठी असलेली पंचंतारांकित रांजणगाव औद्योगिक वसाहतीचा समावेश आहे. या औद्योगिक वसाहतीत स्थानिक युवकांना किती रोजगार मिळाला हा संशोधनाचा विषय असुन या औद्योगिक वसाहतीमुळे मात्र शिरुर तालुक्यातील तहसीलदार कार्यालय, शिरुर, रांजणगाव MIDC आणि शिक्रापुर पोलिस स्टेशन तसेच औद्योगिक वसाहतीच्या कंपनीमधील वरिष्ठ अधिकारी यांनी मात्र करोडो रुपयांची माया जमविली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

 

शिरुर तालुक्यात सन १९९४-९५ साली पंचंतारांकित रांजणगाव औद्योगिक वसाहत उभी राहीली. शासनाने शिंदोडी येथे जलवाहिनीसाठी तर कारेगाव, ढोकसांगवी, रांजणगाव या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करुन त्यावर मोठी औद्योगिक वसाहत उभारली. त्यानंतर आजुबाजुच्या गावातील युवकांनी औद्योगिक वसाहतीत विविध कामांचा ठेका मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यानंतर कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तोडा, फोडा आणि राज्य करा या उक्तीप्रमाणे आसपासच्या काही युवकांना हाताशी धरुन काही कामाचे ठेके दिले.

 

तर काही युवकांना फक्त आश्वासने दिली. त्यामुळे गावातील दोन गटात कंपनीतील ठेक्यासाठी परकोटीचा संघर्ष निर्माण झाला. त्यातुन पुढे जाऊन रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यात ठेके मिळविण्यासाठी स्थानिक युवक एकमेकांच्या जीवावर उठले आणि त्यातुन रांजणगाव MIDC मध्ये मोठया प्रमाणात गुन्हेगारी वाढली. त्यातील काही गुन्हेगारांना कंपनी प्रशासनाने विविध ठेके देत रसद पुरविली. आणि या सर्वांच्या नाड्या मात्र कंपनी मधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याच हातात ठेवल्या.

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जमविली करोडोंची माया…?

रांजणगाव MIDC मधील आंतरराष्ट्रीय कंपनीमधील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरावर काही दिवसांपुर्वी आयकर विभागाने छापा मारला होता. त्यानंतर रांजणगाव MIDC मधील विविध कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही स्थानिक राजकीय नेत्यांना हाताशी धरुन शिरुर तालुक्यातील विविध गावात शेतजमिनी तसेच स्वतःच्या मोठया मोठया इमारती उभ्या केल्याचे धक्कादायक वास्तव बाहेर आल आहे. कारेगाव येथील यश इन चौकातही कंपनीतील अनेक वरिष्ठ तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी प्लॉट घेऊन मोठया मोठया इमारती बांधल्या आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी एवढी करोडो रुपयांची माया नक्की कुठून गोळा केली…? याबाबत सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

(क्रमशः)

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील माजी सनदी आधिकारी विधानसभा लढवणार असल्याची जोरदार चर्चा

…अन्यथा चौकात शर्ट अंथरुण भीक मागुन आणखी पैसे देतो, सामाजिक कार्यकर्त्याचा व्हिडीओ व्हायरल

शिरुर तालुक्यातील सर्व प्रवर्ग दिव्यांगासाठी महाराजस्व अभियान राबवणार; बाळासाहेब म्हस्के

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

22 तास ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

1 दिवस ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

2 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

2 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

2 दिवस ago