शिरुर (तेजस फडके) मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील पोलीस चौकीतील एका पोलिस अधिकाऱ्याने हरियाणा येथील अपघातग्रस्त गाडी मालकाकडून दहा हजारांची मागणी करत पाच हजारांची रक्कम स्वीकारल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते उमेश रणदिवे यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे शिरुर पोलिसांची प्रतिमा मलीन झाली असुन पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक तसेच शिरुरचे उपविभागीय अधिकारी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालणार का…? अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
मांडवगण पोलिस चौकीच्या हद्दीत एक हरियाणा येथील एका व्यक्तीची चारचाकी गाडी (DL 10 CK 7511) रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सात ते आठ फूट खड्यात गेली होती. सध्या पाऊस चालु असल्याने गाडी खड्यातुन बाहेर काढण्यासाठी स्थानिक तरुणांनी ट्रॅक्टर व जेसीबीच्या साह्याने दोरी बांधुन गाडी बाहेर काढली. पाऊसामुळे चिखलात त्यांचे हातपाय व कपडे खराब झाले. परंतु तरीही परप्रांतीय व्यक्तीला मदत करत तरुणांनी माणुसकी दाखवत चारचाकी गाडी बाहेर काढली.
सदर व्यक्ती मदत करणाऱ्या या तरुणांना जेवणासाठी पैसे देत होता. पण तरुणांनी ते नम्रपणे नाकारले. पण एका पोलीस अधिकाऱ्याने मात्र चारचाकी गाडीची चावी काढुन घेत ‘त्या’ व्यक्तीकडे दहा हजारांची मागणी केली. तसेच तडजोडी अंती पाच हजार रुपये घेतले. यामुळे व्यथित झालेल्या एका उमेश रणदिवे नावाच्या तरुणाने व्हिडीओ बनवुन सोशल मीडियावर टाकत सदर प्रकरण उगडकीस आणले.
एखाद्या पोलिस अधिकाऱ्याच्या चुकीच्या वागण्याने संपुर्ण पोलीस प्रशासनाची बदनामी होत असुन सदर प्रकार हा महाराष्ट्र पोलिसांच्या व प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या चांगल्या कार्याला काळीमा फासण्याचा प्रकार असुन संबंधित अधिकाऱ्याने त्या व्यक्तीचे पैसे परत करावेत अन्यथा मांडवगण फराटा येथील चौकात शर्ट अंथरुन भीक मागुन सदरच्या अधिकाऱ्याला पैसे कमी पडत असतील तर देणार असल्याचे रणदिवे यांनी सांगितले आहे.
कार्यकाळ पुर्ण होऊनही वर्षानुवर्षे तिथेच नोकरी…
पुणे ग्रामीण पोलिस दलात अनेक कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ पुर्ण होऊनही त्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. याबाबत ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने आवाज उठवला होता. लोकसभेच्या पार्श्वभुमीवर एकाच जिल्ह्यात तसेच तालुक्यात कार्यकाळ पुर्ण झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र पुणे जिल्ह्यात तसेच शिरुर तालुक्यात कार्यकाळ पुर्ण होऊनही काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच तालुक्यात काम केल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा धाकच उरलेला नसल्याने सगळीकडे मनमानी कारभार चालु असुन पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख आता तरी एकाच तालुक्यात वर्षानुवर्षे ठाण मांडुन बसलेल्या सरकारी जावयांच्या बदल्या करणार का…? अशी शिरुर तालुक्यात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
टिप:- सदर व्हिडिओची सत्यता व त्याबाबतीत तांत्रिक बाबींची जबाबदारी “शिरुर तालुका डॉट कॉम” ची नसुन संबधित व्हिडिओ माहितीस्तव प्रसारित करण्यात येत आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…