मुख्य बातम्या

जि. प.माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांचा अखेर जामीन मंजूर…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : ईडीच्या जेलमध्ये असणारे बहुचर्चित व्यक्तीमत्व पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती मंगलदास बांदल यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या राजकारणाची समीकरणे बदलणार आहे.

पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश मिलिंद जाधव यांनी बांदल याना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे मंगलदास बांदल हे सहा महिन्यानंतर कारागृहाबाहेर येणार आहेत त्यामुळे शिरूर तालुक्यातील राजकारणात पुन्हा एकदा मंगलदास बांदल खळबळ उडून देणार का? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, ईडीने २१ ऑगस्ट २०२४ रोजी मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडी येथील निवासस्थानी कारवाई करीत साडेपाच कोटी रुपये जप्त केले होते. तसेच बांदल यांच्या ८५ कोटी किंमतीच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे. मनीलॉडरींगसह अनेक गुन्हे बांदल यांच्यावर दाखल करण्यात आले होते. यापूर्वीही शिवाजीनगर बँक घोटाळा प्रकरणी बांदल यांनी २१ महिने तुरुंगवास भोगला आहे. त्यानंतर ईडीने अटक केल्याने बांदल हे सहा महिन्यांपासून कारावास भोगत आहेत. आता जमीन मंजूर झाल्याने त्यांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

१२ मार्च सायंकाळी पर्यंत ते जेलमधून बाहेर येतील असे त्यांच्या निकटवर्ती यांनी सांगितले आहे. तर शिरूर तालुका हवेली तालुक्यामध्ये असणारे पैलवान मंगलदास बांदल यांचे समर्थक यांच्यामध्ये उत्साह दिसून आला. विधानसभा निवडणुकीनंतर मंगलदास बांदल यांचा जामीन होईल अशी चर्चा सर्वत्र होती. त्याप्रमाणे जामीन झाला आहे. एकूणच आगामी काळामध्ये मंगलदास बांदल हे आपली ताकद अजमावतील हे नक्की.

मंगलदास बांदल यांच्या घरावर ईडीचा छापा, कोट्यवधींची मालमत्ता जप्त…

मंगलदास बांदल यांच्या पत्नी आणि भावालाही ईडीने चौकशीला बोलावलं; ईडीच्या कोठडीत अजुन आठ दिवस बांदलाचा मुक्काम

मंगलदास बांदल यांच्या घरावर पुन्हा ईडीची धाड

मंगलदास बांदल यांना ईडीने केली अटक; कोट्यवधींचं घबाड

मंगलदास बांदल यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट; चर्चांना उधाण

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

10 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

10 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

10 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

15 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

16 तास ago